Tips for taking care of dry skin in marathi: हिवाळा ऋतू जवळपास सर्वांनाच आवडतो. या हंगामात लोक प्रवासासाठी बाहेर पडतात आणि कुटुंबासोबत वेळ घालवतात. याशिवाय, लोकांसाठी हीटर चालू करणे आणि घरात पांघरून घेऊन आरामात बसणे खूप आनांदायक आहे. परंतु या हिवाळ्याच्या ऋतूचा त्वचेवर नेहमीच नकारात्मक परिणाम होतो. हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि खडबडीत होते. त्यामुळे अनेकवेळा नको त्या समस्यांना सामोरे जावे लागते. बहुतेक लोक त्यांच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी उपचार घेतात. जे प्रत्येकासाठी शक्य होत नाही. विशेषत: रुक्ष ,म्हणजेच कोरडी त्वचा असलेल्या लोकांचा विचार केला तर त्यांना हिवाळ्यात खूप त्रास सहन करावा लागतो.
अशा परिस्थितीत हिवाळ्यात त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही तुमच्या कोरड्या त्वचेची विशेष काळजी घेऊ शकता. यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. या सर्व पद्धती फॉलो करायला अगदी सोप्या आहेत. त्यामुळे विलंब न करता आम्ही तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगतो.
लोकांना वाटते की हिवाळ्यात सनस्क्रीन वापरणे इतके महत्त्वाचे नाही. उलट, असे नाही, लोकांनी हिवाळ्यातही सनस्क्रीनचा नियमित वापर करावा. यामुळे त्वचेला हानिकारक किरणांपासून संरक्षण मिळते. याच्या वापराने हिवाळ्यातही त्वचा हायड्रेट राहते.
ज्या लोकांची त्वचा कोरडी आहे त्यांना नेहमी रात्री त्यांच्या त्वचेची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. कारण यावेळी तुमचे शरीर आरामशीर असते. अशा परिस्थितीत, त्वचा स्किन केअर प्रॉडक्ट योग्यरित्या शोषण्यास सक्षम असते. यामुळे रोज रात्री झोपण्यापूर्वी हात आणि पायांना खोबरेल तेल लावावे.
बऱ्याचदा लोकांना वाटते की त्यांची त्वचा कोरडी आहे आणि त्यांना स्क्रबची गरज नाही, पण तसे नाही. स्क्रबच्या मदतीने तुम्ही तुमची डेड स्किन काढू शकता. त्यामुळे आठवड्यातून एकदा स्क्रब करा.
हिवाळ्यात चुकूनही मॉइश्चरायझर वापरायला विसरू नका. जर तुम्ही मॉइश्चरायझर वापरायला विसरलात तर त्यामुळे त्वचेला तडे जातात. त्यामुळे त्वचा आणखीनच कोरडी होऊ शकते. त्यामुळे थंडीत मॉइश्चरायझर अवश्य लावा.