मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Traveling Tips : प्रवास करताना या गोष्टी पाळा आणि अपघात टाळा
Traveling Tips
Traveling Tips (HT)
14 May 2022, 7:13 AM ISTAtik Sikandar Shaikh
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
14 May 2022, 7:13 AM IST
  • प्रवास करताना सरकारने घालून दिलेले नियम आणि अटींचं पालन केलं तर अपघात होण्याची शक्यता फार कमी असते. गेल्या काही वर्षात मानवी चुकांमुळं अपघातांची संख्या वाढली आहे.

भारतात दरवर्षी अपघातामुळं मृत्यू होणाऱ्या लोकांची संख्या लाखोंच्या घरात आहे. याशिवाय मानवी चुकांमुळं होणाऱ्या अपघातांमुळं सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं तुम्ही प्रवास करत असताना त्यावेळी अनेक गोष्टींची काळजी घेण्याची गरज असते. कारण अनेकदा वाहनचालकाच्या किंवा समोरच्या व्यक्तीच्या चुकांमुळं अपघात होण्याचा धोका वाढत असतो. त्यामुळं वाहन चालवत असताना वाहनचालकानं कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी किंवा कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यायला हवी, याबाबत जाणून घेऊयात.

ट्रेंडिंग न्यूज

दारू पिऊन वाहन चालवू नका - कोणत्याही व्यक्तीनं वाहन चालवत असताना वाहनचालकानं मद्यपान करणं टाळायला हवं. कारण वाहन चालवत असताना व्यक्तीनं मद्यपान केलं तर त्यामुळं व्यक्तीला गाडी चालण्याचं भान राहत नाही. त्यामुळं गाडीचा अपघात होण्याचा होण्याचा धोका वाढतो.

झोपेत गाडी चालवू नका - 'दुर्घटना से देर भली' ही म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल. अनेकदा तुम्हाला दिवसभर काम करत असताना प्रचंड थकवा येतो. त्यामुळं वाहन चालवत असताना वाहनचालकाला झोप येण्याची शक्यता असते. वाहन चालवत असताना जर तुम्हाला झोप येत असेल तर रस्त्याच्या बाजूला गाडी पार्क करून झोप घ्यायला हवी, पूर्ण झोप झाल्यानंतरच गाडी चालवा अन्यथा अपघात होण्याचा धोका वाढतो. याशिवाय वाहन चालवण्यासाठी दोन वाहनचालकांचा वापर करणं हा चांगला पर्याय मानला जातो.

गाडीचा वेग कमी ठेवा- अनेक अपघात हे प्रचंड वेगानं गाडी चालवल्यामुळं होत असतात. कारण गाडी चालवत असताना वाहनाला असलेली स्पीड कंट्रोल करणं फार कठीण असतं. त्यात वाहनासमोर व्यक्ती, प्राणी किंवा इतर गाड्या आल्या तर शंभर टक्के अपघात होतो.

हवामानाचा अंदाज घेऊन प्रवास करा- जर तुम्ही लांब पल्ल्याचा प्रवास करत असाल तर त्यावेळी वातावरण कसं आहे, याची नेहमी खात्री करायला हवी. कारण वातावरणातील दाट धुक्यामुळं किंवा जोरदार पावसामुळं वाहनचालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटण्याची शक्यता असते. याशिवाय उन्हाळ्यात वाढलेल्या उष्णतेमुळं रस्ते तापून वितळायला लागतात, अशा वेळेस गाडीचं टायर फुटण्याची शक्यता असते. त्यासाठी उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तिन्ही मोसमात वातावरणाचा अंदाज घेऊन प्रवास करायला हवा.

वाहतुकीचे नियम पाळा- सरकारने रस्ते तयार केल्यानंतर त्यावर गाडी चालवण्यासाठी काही नियम आणि अटी घातलेल्या असतात. त्या लोकांच्या भल्यासाठी आणि सुरक्षिततेसाठीच असतात. त्यामुळं गाडी चालवत असताना सिग्नलचा वापर करायला हवा तसेच नागरी भागांमध्ये वाहनाचा वेग कमी ठेवल्यास सुरक्षित प्रवास करणं शक्य होते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग