Drinking tea empty stomach: आपल्या देशात चहाइतकी क्रेझ क्वचितच इतर कोणत्याही पेयाची असेल. चहा प्रेमींसाठी सकाळ-संध्याकाळ सर्वकाही चहासोबतच होते. चहा आरोग्यासाठी चांगला नाही असे जगभरातील लोक कितीही म्हणत असले तरी तो पिणाऱ्यांना त्याची अजिबात पर्वा नाही. चहाचे सेवन नीट आणि काही प्रमाणात केले तर फारसे नुकसान होत नाहीत. पण चुकीच्या वेळी चहा प्यायल्यास ते तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते. अशीच एक वेळ म्हणजे सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी चहा पिणे. हीच तुमची चहा पिण्याची वेळ असेल तर आज आम्ही तुम्हाला यापासून होणाऱ्या दुष्परिणामाविषयी सांगणार आहोत.
रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने कॅन्सर होतो याचा कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. परंतु या सवयीमुळे इतर काही आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात. मात्र कर्करोगाचा त्यात समावेश नाही. चहामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि पॉलिफेनॉल असतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात, परंतु ते योग्य वेळी आणि प्रमाणात घेणे महत्त्वाचे आहे. अथवा त्याचे विविध दुष्परिणाम होऊ शकतात.
रिकाम्या पोटी चहा प्यायल्यास पोटाला खूप नुकसान होऊ शकते. यामुळे तुम्हाला ॲसिडिटी, गॅस, पोट फुगणे आणि अपचन यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जे लोक आधीच पोटाशी संबंधित आजारांनी त्रस्त आहेत त्यांनी रिकाम्या पोटी चहा पिऊ नये. वास्तविक, चहामध्ये ॲसिड असते, त्यामुळे तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्यास तुमच्या पोटातील ॲसिडचे प्रमाण आणखी वाढते.
जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर चहा पित असाल तर ही सवय तुमच्या तोंडाच्या आरोग्यासाठी अजिबात चांगली नाही. चहामध्ये नैसर्गिक ऍसिड असते ज्यामुळे दात झपाट्याने किडायला लागतात. यासोबतच श्वासाच्या दुर्गंधीची समस्याही मोठ्या प्रमाणात वाढते. चहामध्ये टॅनिक ऍसिड असते. त्यामुळे दात पिवळे आणि कुरूप दिसतात. घरातील मुलांना लहानपणापासूनच अशी सवय लागली असेल, तर भविष्यात ती त्यांच्या तोंडाच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते.
दररोज रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने शरीरात लोह आणि कॅल्शियम किंवा दोन्हीची कमतरता होऊ शकते. चहामध्ये टॅनिन ऍसिड आढळतात, जे शरीरात लोह आणि कॅल्शियमचे योग्य शोषण रोखतात. त्यामुळे शरीरात अशक्तपणा, थकवा, चक्कर येणे आदी समस्या उद्भवतात. याशिवाय लोह आणि कॅल्शियमच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे तुमच्या शरीरात विविध आजार होऊ शकतात.
(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )