Home Remedies: प्रत्येकाला असं वाटतं की आपण नेहमी तरुणच दिसावं. त्यासाठी अनेक उपाय केले जातात. यासाठी स्किन केअर तो वर्कआउट केलं जातं. प्रत्येकाला तरुण दिसायचे असते. वयाच्या अगदी ४० व्या वर्षीही तरुण राहावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण ठराविक वय ओलांडताच वृद्धत्वाची लक्षणे दिसू लागतात. आजकाल तर अनेकजण लहान वयातच म्हातारे दिसू लागतात. यामागे अनेक कारणे असू शकतात. यावर घरगुती उपाय केले जातात. चला जाणून घेऊयात कोणता रस तुमच्या चेहऱ्यावर चमक आणेल.
लवकर स्किन म्हातारी होऊ लागू नये. हे टाळण्यासाठी तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर गाजराचा रस प्यावा. पोट खराब असले तरीही तुम्ही याचे सेवन करू शकता.
जेव्हा तुम्हाला थकवा आणि सुस्ती वाटत असेल तेव्हा तुम्ही डाळिंबाचा रस प्यावा. हा रस चेहरा सुंदर आणि स्किन मजबूत बनवण्यासाठीफारच उपयुक्त ठरते. हा रस प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात.
अनेक जण बीटरूटचा ज्यूस पितात. हा रस त्वचेसाठी किती उपयुक्त आहे हे सगळ्यांचं माहित आहे. याचे आवर्जून रोज सेवन करावे. हा ज्यूस अनेक प्रकारचे बॅक्टेरिया काढून टाकण्यासाठी देखील हे खूप फायदेशीर आहे. हे हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी देखील खूप उपयुक्त ठरते.
गव्हाचा रस सौंदर्य टिकवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये शक्तिशाली अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी खूप फायदेशीर असतात.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)