Beauty Tips: आपल्या प्रत्येकाला निरोगी, छान चेहरा आणि तंदुरुस्त शरीर हवे असते. यासाठी सगळेच फार मेहनत घेतात. यासाठी अनेक प्रकारचे उपाय करत राहतात. पण आम्ही एक सोपा उपाय सांगत आहोत. जर तुमची सकाळचं रुटीन योग्य ठेवलं तर चमकणाऱ्या चेहऱ्यासोबतच वजनही नियंत्रणात राहते. यासाठी तुम्ही घरी पेय बनवून पिऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया अशा काही पेयांबद्दल जे वजन कमी करण्यास मदत करतीलच पण चेहऱ्यावर चमक आणण्यासही मदत करतील. सकाळी उठल्यावर आणि पाणी प्यायल्यानंतर तुम्ही ही पेये घेऊ शकता. रोज सकाळी उठल्यानंतर ही पेये घेतल्यास ते शरीराला आतून डिटॉक्स करण्यास मदत करते. यामुळे त्वचेच्या समस्यांपासून हळूहळू आराम तर मिळतोच, सोबत वजन नियंत्रित ठेवण्यासही मदत होते.
काकडी आणि लिंबूचं डिटॉक्स पेय रुटीनमध्ये समाविष्ट करा. मार्च महिन्यापासून हवामान गरम होऊ लागले आहे. यामुळे काकडी आणि लिंबूचं पेय शरीराला केवळ डिटॉक्स करणार नाही तर ते आतून हायड्रेटही ठेवेल. यामुळे डार्क सर्कल, पिगमेंटेशनची समस्या कमी होईल आणि वजन कमी होण्यासही मदत होईल.
बहुतेक लोकांना सकाळी दुधाचा चहा पिण्याची सवय असते. पण जर तुम्हाला निरोगी त्वचा हवी असेल आणि वजन नियंत्रित ठेवायचे असेल तर सकाळी ग्रीन टी पिण्याची सवय लावा. यामुळे मेटाबॉलिज्म क्रिया सक्रिय होईल आणि सुरकुत्या, निस्तेजपणा यासारख्या त्वचेवरील वृद्धत्वाची लक्षणं देखील कमी होऊ लागतील आणि त्वचा चमकदार होईल.
तुम्ही तुमच्या सकाळच्या रुटीनमध्ये जिऱ्याचं पाणी समाविष्ट करू शकता. या पाण्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते आणि सोबत मेटाबॉलिज्म क्रियाही वाढते. , यामुळे वाढते वजन नियंत्रणात राहते, याशिवाय तुमच्या त्वचेवरील डाग आणि मुरुमांची समस्याही हळूहळू कमी होईल. मात्र, हे पेय मर्यादित प्रमाणातच घ्या.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)