मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Benefits Of Cinnamon Drink: हिवाळ्यात दुधात मिसळून प्या दालचिनी, मिळतील हे फायदे!

Benefits Of Cinnamon Drink: हिवाळ्यात दुधात मिसळून प्या दालचिनी, मिळतील हे फायदे!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 03, 2024 04:08 PM IST

Cinnamon Benefits During Winter: दालचिनीच्या सेवनाने रक्तदाब आणि रक्ताभिसरण सुधारते तसेच कोलेस्ट्रॉलही कमी होते. याच कारणांमुळे हिवाळ्यात याचे सेवन करणे आवश्यक आहे.

cinnamon benefits
cinnamon benefits (Freepik)

Winter Care: हिवाळ्यात अनेक पदार्थांचे सेवन फायदेशीर ठरते. आपल्या स्वयंपाक घरात असे अनेक मसाले असतात. हे मसाले शरीराला खूप फायदेशीर ठरतात. यातलाच एक मसाला म्हणजे दालचिनी. दालचिनी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. थंडीत दुधात दालचिनी मिसळूनही पिऊ शकता. यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढेल आणि तुमचे शरीर निरोगी राहील. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही दालचिनीचे पाणी पिऊ शकता किंवा त्याला चहासारखे बनवून पिऊ शकता. खरं तर, दालचिनीमध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात आणि त्यात भरपूर पोषक असतात, त्यामुळे ते शरीरासाठी फायदेशीर असते.

जाणून घेऊयात फायदे

> मासिक पाळी दरम्यान महिलांसाठी हे फायदेशीर आहे. यामुळे पाळीतील वेदना कमी होतात.

> दालचिनी तुमची प्रतिकारशक्ती वाढवते आणि रोगांशी लढण्याची तुमची क्षमता वाढवते.

> दालचिनीचे सेवन केल्याने पोटाशी संबंधित समस्या दूर होतात आणि अ‍ॅसिडिटी आणि अपचनापासून आराम मिळतो.

> दालचिनीचे सेवन केल्याने तुमचे खराब कोलेस्ट्रॉल कमी होते आणि रक्ताभिसरण सुधारते.

> दालचिनीच्या सेवनाने तुम्ही तुमचे वजन नियंत्रित करू शकता.

या सगळ्या कारणांनी जर तुम्ही दालचिनीचे सेवन करत नसाल तर आजपासून सुरू करा. हे कोलेस्टेरॉल कमी करू शकते आणि यामुळे रक्तदाब सुधारू शकतो. जर तुम्हाला पचनाशी संबंधित समस्या असतील तर दालचिनी तुमच्यासाठी रामबाण उपाय आहे कारण ते पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम देते. यामुळे तुमची आम्लपित्त, अपचन आणि पोट फुगण्याच्या समस्या दूर होऊ शकतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel