मानसिक आरोग्य आणि होमिओपॅथीवर भाष्य करणारं ‘फील गुड हील गुड’; डॉ. मुकेश बत्रा यांचं नवं पुस्तक!-dr mukesh batra released his 10th book feel good heal good staying happy with homeopathy ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  मानसिक आरोग्य आणि होमिओपॅथीवर भाष्य करणारं ‘फील गुड हील गुड’; डॉ. मुकेश बत्रा यांचं नवं पुस्तक!

मानसिक आरोग्य आणि होमिओपॅथीवर भाष्य करणारं ‘फील गुड हील गुड’; डॉ. मुकेश बत्रा यांचं नवं पुस्तक!

Apr 23, 2024 01:46 PM IST

Dr. Mukesh Batra Feel Good Heal Good Book: नुकतंच डॉ. मुकेश बत्रा यांचं दहावं पुस्तक ‘फील गुड हिल गुड स्टेयिंग हॅपी विथ होमिओपॅथी’ प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने त्यांनी ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’शी संवाद साधला.

मानसिक आरोग्य आणि होमिओपॅथीवर भाष्य करणारं ‘फील गुड हील गुड’; डॉ. मुकेश बत्रा यांचं नवं पुस्तक!
मानसिक आरोग्य आणि होमिओपॅथीवर भाष्य करणारं ‘फील गुड हील गुड’; डॉ. मुकेश बत्रा यांचं नवं पुस्तक!

Dr. Mukesh Batra Feel Good Heal Good Book: सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक आरोग्याचे महत्त्व सगळ्यांनाच पटू लागले आहे. आजवर मानसिक आरोग्याबद्दल बोलणं अगदीच निषिद्ध असल्यासारखं मानलं गेलं. मानसिक आरोग्यावर बोलणारा व्यक्ती ठार वेडा आहे, असं समजलं जात होतं. परंतु, आता परिस्थिती बदलली आहे. अगदी दहा वर्षांच्या मुलांपासून ते ८० वर्षांच्या वृद्धांपर्यंत सगळेच मानसिक आरोग्यावर थेट भाष्य करताना दिसतात. ज्याप्रमाणे आपल्याला शारीरिक वेदना होतात आणि आपण त्याच्यावर औषध उपचार करतो, त्याचप्रमाणे वेदना होत नसल्या तरी मानसिक आरोग्यावरही लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहे. या सगळ्यात होमिओपॅथी खूप महत्त्वाची भूमिका बजावते. याचेच महत्व डॉ. मुकेश बत्रा यांनी त्यांच्या ‘फील गुड हिल गुड स्टेयिंग हॅपी विथ होमिओपॅथी’ या पुस्तकातून मांडलं आहे.

नुकतंच डॉ. मुकेश बत्रा यांचं दहावं पुस्तक ‘फील गुड हिल गुड स्टेयिंग हॅपी विथ होमिओपॅथी’ प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने त्यांनी ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’शी संवाद साधला. या खास संवादात त्यांनी आपल्या पुस्तकाबद्दल तर सांगितलं, मात्र मानसिक आरोग्य आणि होमिओपॅथी विषयी बऱ्याच गोष्टी शेअर केल्या. या पुस्तकाविषयी बोलताना डॉ. मुकेश बत्रा म्हणाले की, ‘सध्या आपण ज्या काळात वावरत आहोत, त्यात मानसिक आरोग्य फार महत्त्वाचे आहे. ज्याप्रकारे आपण आपल्या शारीरिक समस्यांकडे दुर्लक्ष न करता औषध उपचार करतो, त्याच प्रकारे मानसिक आरोग्याची काळजी घेऊन त्यावर औषधोपचार करणे खूप गरजेचे आहे. मानसिक आरोग्याच्या या समस्या आणि त्यावर होमिओपॅथी कशाप्रकारे काम करते, याचा विस्तार या नव्या पुस्तकातून मांडण्यात आला आहे.’

Charming Personality: तुमच्या व्यक्तिमत्त्वात करा या गोष्टींचा समावेश, सर्व जण करतील प्रशंसा

परदेशातही वाढवलं होमिओपॅथीचं महत्त्व!

होमिओपॅथीच्या विश्वात डॉ. मुकेश बत्रा हे फार मोठे नावे आहे. त्यांनी आजवर अनेक दिग्गज सेलिब्रिटी, राजकारणी यांपासून ते परदेशातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांवर उपचार केले आहेत. त्यांच्या होमिओपॅथीवर अनेकांचा दृढ विश्वास आहे. होमिओपॅथी केवळ भारतातच नाही, तर परदेशात देखील आता अतिशय उपयुक्त औषध पद्धती असल्याचे मानले जात आहे. यामध्ये डॉ. मुकेश बत्रा यांचे महत्त्वाचे योगदान आहे.

होमिओपॅथीविषयीच्या गैरसमजुती

होमिओपॅथी म्हटलं की, अनेकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न येतात. इतकंच नाही, तर होमिओपॅथीबद्दल अनेक गैरसमजदेखील आहेत. यातला महत्त्वाचा गैरसमज म्हणजे होमिओपॅथीची औषधं फार हळूहळू काम करतात. याविषयी बोलताना डॉक्टर बत्रा म्हणाले की, ‘होमिओपॅथी हे सगळ्यात प्रभावी माध्यम आहे. मात्र, त्याविषयी गैरसमजुती देखील भरपूर आहेत. आजही आपण अशा समाजात राहतो, जिथे एखाद्याला मानसिक त्रास होत असेल तर, त्याला देवाची करणी वगैरे मानून देवदेवस्की केली जाते. त्यांच्यावर डॉक्टरांकरवी उपचार करण्या ऐवजी मंदिरात नेऊन बांधणं किंवा झाडू आणि काठीने फटके देणे, अशा गोष्टी लोकं करतात. मात्र, हे अगदीच अयोग्य आहे. अनेकदा असं होतं की, आजार खूप बळवल्यावर लोक होमिओपॅथीकडे वळतात. होमिओपॅथीच्या औषधांमुळे कुठलाही दुष्परिणाम होत नाही, हे अगदी खरंय. मात्र, औषधं खूप हळूहळू काम करतात यात अजिबात तथ्य नाही.’

SMA in Babies: तान्‍ह्या बाळांमध्‍ये वाढतोय स्पाइनल मस्कुलर एट्रॉफी हा आजार, जाणून घ्या लक्षणं!

होमिओपॅथी हळूहळू काम करते?

डॉ. बत्रा पुढे म्हणाले की, तुम्ही आपला आजार जाणून घेतल्यानंतर त्यावर ताबडतोब होमिओपॅथीचे उपचार सुरू केले, तर त्याचे परिणाम वेळेत दिसू लागतात. मात्र, तुम्ही आजार बळवल्यानंतर होमिओपॅथीची औषध घेण्यास सुरुवात केली, तर ती तितकी प्रभावीपणे काम करू शकत नाहीत. अशावेळी त्याचा प्रभाव हा हळूहळू दिसू लागतो, हे मात्र खरं आहे. त्यामुळे लोकांनी अशा गैरसमजुती सोडून वेळीच औषध उपचारांकडे वळले पाहिजे.’ होमिओपॅथीविषयी आणखी एक गैरसमज आहे, तो म्हणजे होमिओपॅथीसोबत ऍलोपथीची औषधं घेता येत नाहीत. या विषयी बोलताना डॉक्टर म्हणाले की, ‘यातही कुठलं तथ्य नाही. होमिओपॅथी आणि इतर औषध एकत्र घेतली जाऊ शकतात. दोघांचे परिणाम हे एकत्र प्रभावी असतात.’

डॉ. मुकेश बत्रा यांनी सांगितला भन्नाट किस्सा

तब्बल पन्नास वर्षांच्या क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये डॉ. मुकेश बत्रा यांनी अनेक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांवर उपचार केले आहेत. या प्रवासात एक किस्सा त्यांच्या कायम लक्षात राहिला. हा किस्सा त्यांनी ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’सोबत आवर्जून शेअर केला. आपण अनेक ठिकाणी विविध पेंटिंग्स, चित्र किंवा प्रसिद्ध कलाकृती या एखाद्या वास्तूच्या वरच्या भागी किंवा छतावर चित्रित केलेल्या बघितल्या असतील. यामागे देखील एक मोठं कारण आहे. याचा किस्सा शेअर करताना डॉ. मुकेश बत्रा म्हणाले की, ‘माझ्याकडे एक प्रसिद्ध चित्रकार औषध उपचारांसाठी नियमित येत होते. माझ्या औषधोपचारांनी त्यांना फरक देखील पडला. त्यांना नैराश्य होतं, त्यातून ते बाहेर पडले आणि मग मी त्यांना त्यांचं एक वचन आठवण करून दिलं की, तुम्ही बरे झाल्यावर माझ्यासाठी एक छान चित्र तयार करणार होतात. यावर त्या चित्रकाराने हातात कुंचला पकडला आणि डॉ. बत्रा यांच्या क्लिनिकचं छत रंगवून टाकलं.’

Personality Development Tips: आयुष्यात खूप यश हवं आहे? या ४ सवयी सुधारा,होईल फायदा!

इतकं सुंदर चित्र त्यांनी सिलिंगवर का काढलं, असा प्रश्न डॉ. बत्रा यांना पडला. त्याचं कारण विचारलं असता चित्रकार म्हणाले की, ‘एखादे चित्र हे छतावर काढले जाते, तेव्हा त्याचे महत्त्व अधिक वाढते. अतिशय प्रसिद्ध चित्रकारांनी देखील त्यांची कलाकृती छतावर किंवा वरच्या बाजूला चितारल्या आहे. याचे कारण म्हणजे माणूस जेव्हा झोपतो किंवा रिलॅक्स होण्याच्या स्थितीत असतो, तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर अशी एखादी छानशी कलाकृती असली की, त्याचं मन प्रसन्न होतं आणि तेच त्या कलाकृतीचं देखील यश असतं.’ या छोट्याशा गोष्टींने डॉ. मुकेश बत्रा यांचा चित्रांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकला. त्यांच्या ‘फील गुड हिल गुड स्टेयिंन हॅपी विथ होमिओपॅथी’ या पुस्तकात देखील अशाच काही महत्त्वाच्या गोष्टीतून लोकांना मानसिक आरोग्य आणि होमिओपॅथीचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Whats_app_banner
विभाग