Health Tips : सतत बोटं मोडण्याच्या सवयीमुळे खरंच संधिवात होतो का? काय आहे सत्य? जाणून घ्या…
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Health Tips : सतत बोटं मोडण्याच्या सवयीमुळे खरंच संधिवात होतो का? काय आहे सत्य? जाणून घ्या…

Health Tips : सतत बोटं मोडण्याच्या सवयीमुळे खरंच संधिवात होतो का? काय आहे सत्य? जाणून घ्या…

Nov 03, 2024 02:50 PM IST

Is knuckle cracking bad: अनेकांना असे वाटते की, लहान किंवा तरुण वयात बोटं मोडल्याने वाढत्या वयात आणि म्हातारपणात आपल्या हातापायात वेदना होऊ शकतात किंवा संधिवाताची समस्या उद्भवू शकते.

सतत बोटं मोडण्याच्या सवयीमुळे खरंच संधिवात होतो का?
सतत बोटं मोडण्याच्या सवयीमुळे खरंच संधिवात होतो का? (shutterstock)

Is knuckle cracking bad: अनेकदा जेव्हा थकवा जाणवतो, किंवा हात आखडल्यासारखं वाटतो, तेव्हा बरेच लोक बोटं मोडण्यास सुरुवात करतात. बऱ्याचदा आपण बोटं मोडत असताना घरातील ज्येष्ठ मंडळी आपल्या तसे न करण्यासाठी दम भरतात. बोटं मोडण्याची ही सवय चांगली नाही, असे त्यांचे मत आहे. त्याचबरोबर अनेकांना असे वाटते की, लहान किंवा तरुण वयात बोटं मोडल्याने वाढत्या वयात आणि म्हातारपणात आपल्या हातापायात वेदना होऊ शकतात किंवा संधिवाताची समस्या उद्भवू शकते. परंतु, डॉक्टर आणि संशोधन याबद्दल काय म्हणतात ते जाणून घ्या.

तुम्ही कधी विचार केला आहे का की, बोटं खेचताना किंवा मोडताना क्रॅकिंग आवाज का येतो? खरं तर, बोटांचे सांधे ओढले की सांध्यांमधील द्रव पदार्थातील दाब कमी होऊन त्या द्रवातील विरघळलेल्या वायूंमध्ये बुडबुडे तयार होतात. बोटांवर दाब टाकताच हे बुडबुडे फुटतात आणि कडकड असा आवाज निघतो. या प्रक्रियेला विज्ञानात कॅव्हिटेशन म्हणतात. जेव्हा आपण बोटं मोडतो, तेव्हा या द्रवात वायू पुन्हा विरघळायला किमान अर्धा तास लागतो. याचा अर्थ असा की, आपली बोटे पुन्हा मोडण्यासाठी कमीतकमी अर्धा तास आवश्यक आहे.

Walnut Oil Benefits : अक्रोडच नव्हे, तर अक्रोडाचे तेलही आहे शरीरासाठी गुणकारी! वाचा याचे ५ मोठे फायदे

काय म्हणते संशोधन?

सतत बोटं मोडत राहिल्याने संधिवातासारखी समस्या उद्भवू शकते, असे तुम्हाला वाटत असेल तर ते पूर्णपणे चुकीचे आहे. बोटं मोडण्याचा  संधिवात किंवा सांधेदुखीशी अजिबात कोणताही संबंधित नाही. मेडिकल न्यूज टुडेमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, २०११मध्ये २१५ लोकांचा अभ्यास करण्यात आला. ज्यामध्ये, दररोज २० टक्के लोक बोटं मोडत होती. या गटातील सुमारे १८.१ टक्के लोकांच्या हातात संधिवात होता. तर २१.५ टक्के लोकांनी बोटं मोडली नाहीत नाहीत. अभ्यासात असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, बोटं मोडण्याचा आणि सांधेदुखी, संधिवाताचा धोका दोन्ही लोकांमध्ये समान आहे. बोटं मोडणारी लोकं असोत वा न मोडणारी लोक असोत, कुणालाही संधिवात होऊ शकतो.

वारंवार बोटं मोडण्याची सवय असेल तर काय होईल?

जर, बोटं वारंवार मोडली तर सांध्यामध्ये सूज किंवा वेदना होऊ शकते. यामुळे अनेकवेळा हातांची पकड कमकुवत होऊ लागते. याबाबत संशोधन झाले नसले, तरी वारंवार बोटं मोडण्याची सवय कधीकधी मानसिक समस्येचे रूप धारण करते. त्यापासून सुटका मिळवण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner