मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Throat Cancer: ओरल सेक्समुळे घशाच्या कर्करोगाचा धोका असतो का? जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ

Throat Cancer: ओरल सेक्समुळे घशाच्या कर्करोगाचा धोका असतो का? जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 29, 2024 10:33 PM IST

Health Tips: घशाचा कर्करोग ज्याला स्वरयंत्राचा कर्करोग देखील म्हणतात, हा एक प्रकारचा घातक रोग आहे, जो घशाच्या ऊतींमध्ये विकसित होतो. ओरल सेक्समुळे घशाच्या कर्करोगाचा धोका असतो का जाणून घ्या.

घशाचा कर्करोग
घशाचा कर्करोग (unsplash)

Throat Cancer: ओरल सेक्समुळे तुमच्या घश्याच्या मागच्या बाजूला कॅन्सर होऊ शकतो. या प्रकारच्या कॅन्सरला ओरोफॅरेजियल कॅन्सर (oropharyngeal Cancer) असं म्हणतात. अन्प्रोटेक्टेट ओरल सेक्समुळे हा त्रास होऊ शकतो .घशाचा कर्करोग, ज्याला स्वरयंत्राचा कर्करोग देखील म्हणतात, हा एक प्रकारचा घातक रोग आहे जो घशाच्या ऊतींमध्ये विकसित होतो. धूम्रपान आणि अति मद्यपान हे या आजारासाठी धोक्याचे घटक आहेत. घशाच्या कर्करोगाची ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (HPV) संसर्ग कारणीभूत ठरतो. नवी मुंबई येथील मेडिकवर हॉस्पिटल्सचे वरिष्ठ सल्लागार हेड अँड नेक सर्जन डॉ. दीपक खन्ना यांनी घशाच्या कर्करोगाबद्दल सांगितले.

घशाच्या कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. ही वाढ प्रामुख्याने ऑरोफॅरिंजियल कर्करोगाच्या तीव्र वाढीस कारणीभूत ठरते. ज्यामुळे टॉन्सिल्स आणि घशाच्या मागील भागावर परिणाम होतो. या प्रकारच्या कर्करोगास ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (HPV) कारणीभूत ठरतो, ज्यामुळे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोग देखील होतो. एचपीव्ही हा असुरक्षित सेक्सद्वारे प्रसारित केला जातो. ज्यामध्ये ऑरोफॅरिंजियल कर्करोगाचा एक प्रमुख जोखीम एकापेक्षा अधिक ओरल सेक्स पार्टनर असलेल्या लोकांना हा कर्करोग होण्याची शक्यता आहे. हे एचपीव्ही लसीकरणाचे महत्त्व अधोरेखित करते. कारण केवळ गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगच नाही तर काही प्रकारच्या घशाच्या कर्करोगाविरूद्ध हा प्रतिबंधात्मक उपाय ठरत आहे.

बहुतेक लोक एचपीव्हीचा संबंध गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाशी जोडतात. हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की तोंडाच्या कर्करोगासही बऱ्याचदा एचपीव्ही संसर्ग कारणीभूत ठरतो. तोंडाच्या कर्करोगाचा संबंध एचपीव्हीच्या उच्च-जोखमीच्या आहे, विशेषत: तरुणांमध्ये याचा संसर्ग आढळून येतो. केवळ गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगच नाही तर तोंडाचा आणि घशाचा कर्करोग देखील रोखण्यासाठी एचपीव्ही लसीकरण गरजेचे आहे. हे ओळखणे आवश्यक आहे की, कर्करोग प्रतिबंधाच्या इतर प्रकारांप्रमाणे एचपीव्ही लसीचा प्रभाव वैयक्तिक संरक्षणाच्या पलीकडे आहे. लसीकरणाद्वारे एचपीव्ही संसर्गाचा प्रसार कमी करून, महिलांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण करता येते ज्याचा त्यांना नक्कीच फायदा होतो. यामुळे तोंडाच्या कर्करोगाची प्रकरणे कमी करणे आणि आरोग्य सेवा प्रणालींवरील ओझे कमी करणे गरजेचे आहे. शिवाय, एचपीव्ही आणि तोंडाचा कर्करोग यांच्याबाबत जागरूकता वाढवणे अधिक लोकांना लसीकरणासाठी प्रोत्साहन करणे आवश्यक आहे.

एकापेक्षा अधिक ओरल सेक्स पार्टनर असलेल्या महिलांना एचपीव्ही संसर्गामुळे तोंडाचा कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो. हे सुरक्षित लैंगिक संभोगाचे महत्त्व अधोरेखित करते. जागरूकता आणि साक्षरता वाढवून, या रोगाचा प्रसार कमी करणे आणि सर्वांगीण विकासास प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. ओरल सेक्स आणि तोंडाचा कर्करोग यांच्यातील संबंध काहींना अस्वस्थ करणारा असला तरी या विषयावर खुलेपणाने चर्चा करणे महत्त्वाचे आहे. वेळीच निदानाकरिता नियमित तपासणी करणे, सुरक्षित लैंगिक पद्धतींचा प्रचार व प्रसार करणे गरजेचे आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग