Hair Care Tips: शॅम्पूनंतर केस कोरडे होतात का? या गोष्टी लावल्याने मिळतील चमकदार हेअर
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Hair Care Tips: शॅम्पूनंतर केस कोरडे होतात का? या गोष्टी लावल्याने मिळतील चमकदार हेअर

Hair Care Tips: शॅम्पूनंतर केस कोरडे होतात का? या गोष्टी लावल्याने मिळतील चमकदार हेअर

Jun 18, 2024 12:46 PM IST

Silky Smooth Hair: तुमचे केस सुद्धा शॅम्पू केल्यानंतर कोरडे आणि निर्जीव होतात का? हे उपाय तुम्हाला चमकदार केस मिळवण्यासाठी मदत करतील. पाहा -

चमकदार केस मिळवण्यासाठी उपाय
चमकदार केस मिळवण्यासाठी उपाय (unsplash)

Remedies to Get Silky Smooth Hair: शॅम्पू केल्यानंतर केस अनेकदा कोरडे आणि निर्जीव होतात. हे कोरडे, निर्जीव आणि निस्तेज केस चमकदार करण्यासाठी बहुतेक लोक कंडिशनरचा वापर करतात. पण केस चमकावेत तसेच मजबूत व्हावे असे वाटत असेल तर कंडिशनर नव्हे तर या घरगुती गोष्टींचा वापर करा. यामुळे तुमचे केस चमकदार तर होतीलच पण केस दाट आणि मजबूत सुद्धा होतील. चला तर मग जाणून घेऊया शॅम्पूनंतर कोणत्या गोष्टी वापरता येतील.

ॲपल साइडर व्हिनेगर

हे केसांवर वापरण्यासाठी एक झाकण ॲपल साइडर व्हिनेगर दोन झाकण पाण्यामध्ये मिक्स करा. शॅम्पू केल्यानंतर शेवटी या पाण्याने केस धुवून घ्या. हे केवळ केसांमधून हानिकारक केमिकल शॅम्पू पूर्णपणे काढून टाकण्यास मदत करत नाही तर केसांना चमक देखील देते.

बिअरने धुवा केस

शॅम्पू नंतर फ्लॅट बिअरने केस धुवा. असे केल्याने केसांना बिअरमध्ये असलेले प्रोटीन मिळते. जे त्याला व्हॉल्यूम आणि चमक देईल. बिअर केसांसाठी उत्तम असल्याचे म्हटले जाते.

अंड्याचा मास्क

केसांना अंडी लावण्याचे अनेक फायदे तुम्हाला माहीत आहेत. अंडी फेटून कोरड्या केसांना लावा. साधारण अर्ध्या तासानंतर केस स्वच्छ धुवून घ्या. याने केस चमकदार होतात. शिवाय केसांचे आरोग्य देखील सुधारते.

कोमट नारळाचे तेल

खोबरेल तेल थोडे कोमट करा आणि त्याने केसांना मसाज करा. सुमारे एक ते दोन तास तसेच राहू द्या. त्यानंतर केसांना शॅम्पू करा. यामुळे केसांना चमक आणि ताकद मिळेल.

एलोवेरा जेल

शॅम्पू केल्यानंतर केसांना फ्रेश एलोवेरा जेल लावा आणि साधारण अर्धा तास तसेच राहू द्या. त्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे. एलोवेरा जेलमुळे केसांना चमक मिळेल तसेच पोषणही मिळेल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner