Viral Milk and Bread Facial: तुम्ही सकाळी ब्रेड आणि चहाचा नाश्ता अनेक वेळा केला असेल. ब्रेडवर बटर लावल्याने जी चव येते त्याची तुलना नाही. पण तुम्हाला माहित आहे का की या ब्रेडने तुम्ही तुमचा चेहराही चमकवू शकता. हे थोडं विचित्र वाटेल पण शंभर टक्के खरं आहे. ब्रेड आणि थोडे दूध तुमच्या त्वचेसाठी असे चमत्कार करू शकतात जे महाग ब्युटी प्रोडक्टही करू शकत नाहीत. उन्हाळ्यात चेहऱ्यावर साचलेली घाण तुम्ही घरच्या घरी काही मिनिटांत साफ करू शकता. सध्या दूध आणि ब्रेडचे फेशियल चांगलेच व्हायरल होत आहे. चला मग जाणून घेऊया याबद्दल सविस्तर
हे फेशियल करण्यासाठी तुम्हाला थोडे कच्चे दूध आणि एक ब्रेड लागेल. आता ब्रेडचे छोटे तुकडे करून दुधात बुडवून घ्या. आता काही वेळाने तुम्हाला दिसेल की ब्रेडचे तुकडे फुगले आहेत आणि एक घट्ट पेस्ट तयार झाली आहे. या पेस्टला चमच्याने नीट फेटून घ्या. तुमचा दूध आणि ब्रेडचा जादुई फेस पॅक तयार आहे. आता हाताच्या मदतीने संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि थोडा वेळ स्क्रब करा. सुमारे २० मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवा.
हा जादुई फेस पॅक लावण्याचे अनेक फायदे आहेत. हे स्क्रबसारखे सुद्धा काम करते. त्यामुळे वर्षानुवर्षे साचलेली घाणही दूर होते. यासोबतच उन्हामुळे होणारा टॅनिंगचा थरही पहिल्या वापरानंतर नाहीसा होऊ लागतो. कच्च्या दुधात लॅक्टिक अॅसिड आढळते जे त्वचा उजळण्यास मदत करते. हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून दोनदा वापरू शकता.
ब्रेड आणि दुधाचे हे अनोखे मीश्रण केवळ तुमचा चेहराच चमकवत नाही तर तुम्ही ते तुमच्या संपूर्ण शरीरावर देखील लावू शकता. यासाठी तुम्हाला मोठ्या प्रमाणात ब्रेड आणि दुधाची आवश्यकता असेल. आंघोळीपूर्वी त्याच्या मदतीने संपूर्ण शरीराची मालिश करा. काही वेळ कोरडे होऊ द्या आणि नंतर पाण्याने धुवा. आठवड्यातून दोनदा असे केल्याने संपूर्ण शरीरावर चमक येईल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या