Cities Name After Demon : आपल्या देशातील अनेक शहरांची नावे देव, देवी, पीर-फकीर, राजे, महाराज आणि नवाबांच्या नावावर आहेत. पण, तुम्हाला माहीत आहे का की, काही शहरांची नावे राक्षसांच्या नावावर देखील आहेत. कदाचित हे वाचून तुम्हाला थोडं विचित्र वाटेल. पण, हे खरे आहे की, भारतात उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत अशी अनेक शहरे आहेत, ज्यांची नावे कोणत्या ना कोणत्या राक्षसाच्या नावावर ठेवण्यात आली आहेत.
दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यात म्हैसूर नावाचे एक अतिशय लोकप्रिय शहर आहे. हे महिषासुर या राक्षसाच्या नावाशी संबंधित आहे. म्हैसूर हे महिषासुराचे शहर म्हणून ओळखले जाते. असे मानले जाते की, महिषासुराच्या काळात या शहराला महिषा-उरू असे म्हटले जात होते. त्यानंतर कन्नड भाषेत महिशुरू आणि शेवटी म्हैसूरू किंवा म्हैसूर म्हणून ओळखले जाऊ लागले.
पलवल हे हरियाणा राज्यातील प्रसिद्ध शहर आहे. पालंबासुर या राक्षसाच्या नावावरून या शहराचे नाव पडल्याचे मानले जाते. पूर्वी ते पालंबरपूर म्हणून ओळखले जात असे. पण कालांतराने त्याचे नाव बदलत राहिले आणि शेवटी ते पलवल झाले.
तिरुचिरापल्ली हे तमिळनाडू राज्यातील एक लोकप्रिय शहर आहे. या शहराचे नाव थिरिसरण नावाच्या राक्षसावरून पडले असे मानले जाते. काळानुसार या शहराचे नाव बदलत राहिले. प्रथम ते थिरिसिकारापुरम, नंतर थिरिसीपुरम आणि शेवटी तिरुचिरापल्ली बनले.
जालंधर हे पंजाब राज्यातील लोकप्रिय शहर आहे. ते चामड्याच्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. असे मानले जाते की प्राचीन काळी जालंधर ही जालंधर नावाच्या राक्षसाची राजधानी होती. त्यामुळे या शहराचे नाव जालंधर पडले.
गया शहर हे बिहार राज्यातील प्रसिद्ध शहर आहे. या शहराला धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्व आहे. गयासुर या राक्षसाच्या नावावरून गया हे नाव पडल्याचे मानले जाते. या ठिकाणाच्या नावाची एक धार्मिक कथा प्रचलित आहे की, गयासुरला ब्रह्मदेवाचे वरदान मिळाले होते, ज्यामुळे तो देवी-देवतांपेक्षा अधिक शक्तिशाली झाला होता. अशा स्थितीत तो ज्याला ज्याला स्पर्श करत होता, त्याची सगळी पापे नष्ट होत होती. त्यामुळे मोठ्या संख्येने राक्षस स्वर्गात पोहोचू लागले. यामुळे त्रासलेल्या भगवान विष्णूंनी ब्रह्मदेवाकडे यज्ञाद्वारे गयासुराचे शरीर मागितले होते.
संबंधित बातम्या