Chewing Gum Benefits: च्युइंगम खाण्याचे फायदे माहिती आहेत का? कॅलरीज बर्न करण्यापासून, स्मरणशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त-do you know the benefits of chewing gum from burning calories helpful in enhancing memory ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Chewing Gum Benefits: च्युइंगम खाण्याचे फायदे माहिती आहेत का? कॅलरीज बर्न करण्यापासून, स्मरणशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त

Chewing Gum Benefits: च्युइंगम खाण्याचे फायदे माहिती आहेत का? कॅलरीज बर्न करण्यापासून, स्मरणशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त

Sep 24, 2024 03:26 PM IST

Benefits of eating chewing gum: अनेक लोक सतत च्युइंगम चघळत असतात. काही लोक तोंडाची स्वच्छता राखण्यासाठी खातात, तर काही लोक तोंड बंद ठेऊन तोंडाला सोक पडू नये म्हणून चघळत असतात.

Health benefits of chewing gum
Health benefits of chewing gum (freepik)

Health benefits of chewing gum:  लहानपणी प्रत्येकाने च्युइंगम चघळला असेलच. लहानापासून मोठ्यापर्यंत हे सर्वांचे आवडते आहे. क्वचितच कोणी असेल ज्याला च्युइंगम आवडणार नाही. अनेक लोक सतत च्युइंगम चघळत असतात. काही लोक तोंडाची स्वच्छता राखण्यासाठी खातात, तर काही लोक तोंड बंद ठेऊन तोंडाला सोक पडू नये म्हणून चघळत असतात. अशाप्रकारे च्युइंगम सगळेच खातात. पण तुम्हाला माहीत आहे का च्युइंगम आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे. या लेखाद्वारे आपण च्युइंगमचे फायदे जाणून घेणार आहोत.

तोंडाला सोक पडण्याच्या समस्येपासून सुटका मिळेल-

जर तुम्ही च्युइंगम चघळल्यास तुम्हाला कोरड्या तोंडाच्या समस्येपासून आराम मिळतो. च्युइंगम तोंडाच्या समस्या दूर करण्यास मदत करते. त्यामुळे प्रत्येकाने एकदा तरी च्युइंगम चघळायला हवा.

कॅलरीज बर्न करण्यास मदत-

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, च्युइंगगम कॅलरीज बर्न करण्यास मदत करते. जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही च्युइंगम नक्कीच चघळला पाहिजे. कारण कॅलरीज बर्न करून वजन कमी होते.

मळमळपासून आराम-

जर तुम्हाला मळमळ होत असेल तर च्युइंगम चघळणे सुरू करा. अनेक वेळा प्रवासादरम्यान काही लोकांना मळमळ वाटते. अशा परिस्थितीत तुम्ही च्युईगम चघळल्यास तुमची मळमळ थांबेल आणि तुम्हाला खूप आरामही मिळेल.

स्मरणशक्ती सुधारणे-

च्युइंगम्स मेंदूसाठी अतिशय फायदेशीर असतात. जर तुम्ही नियमितपणे च्युइंगम चघळत असाल तर ते तुमची स्मरणशक्ती सुधारेल आणि रक्त प्रवाह देखील वाढवेल. च्युइंगम चघळल्याने तणाव कमी करता येतो. तणाव कमी झाल्याने तुमचा मेंदू सक्रिय राहतो. आणि त्यामुळे तुमची स्मरणशक्तीही सुधारण्यास मदत होते.

सक्रिय ठेवण्यास मदत-

थकवा जाणवत असेल तर च्युइंगम चघळायला सुरुवात करा. कारण च्युइंगम तुम्हाला पूर्णपणे सक्रिय ठेवेल आणि थकवा आणि अशक्तपणा दोन्ही दूर करेल. त्यामुळे प्रत्येकाने च्युइंगम चघळणे आवश्यक आहे.

तोंडाच्या आजरांपासून बचाव-

जेव्हा तुम्ही च्युइंगम चघळता तेव्हा तोंडात जास्त लाळ तयार होते. लाळ तोंडाच्या आजारांना प्रतिबंध करते जसे दात किडणे, पोकळी इत्यादी होय. जर तुम्ही असा विचार करत असाल की तुम्हाला हवे ते च्युइंगम खाऊ शकता, तर तसे नाही.तुमचे दात किडण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही फक्त शुगर फ्री च्युइंगम खावे. लठ्ठपणा वाढवण्याबरोबरच, कृत्रिम गोड पदार्थ असलेले च्युइंगम्ससुद्धा दातांना नुकसान पोहोचवू शकतात.

डबल चिन दूर करण्यासाठी मदत-

डबल चिन म्हणजेच जर तुमच्या मानेजवळ लठ्ठपणा दिसू लागला असेल, तर च्युइंगमपेक्षा चांगला व्यायाम दुसरा असूच शकत नाही. ते चघळल्याने दातांवरील पिवळे डागही साफ होऊन ते चमकू लागतात. श्वासाची दुर्गंधी असल्यास, च्युइंगम मदत करेल.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner
विभाग