Night Skin Routine: तुम्ही फॉलो करता का नाईट स्किन केअर? जाणून घ्या का आहे महत्त्वाचे-do you follow night skin care routine know why it is important ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Night Skin Routine: तुम्ही फॉलो करता का नाईट स्किन केअर? जाणून घ्या का आहे महत्त्वाचे

Night Skin Routine: तुम्ही फॉलो करता का नाईट स्किन केअर? जाणून घ्या का आहे महत्त्वाचे

Feb 28, 2024 09:58 PM IST

Skin Care Tips: रात्री झोपण्यापूर्वी नाईट स्किन केअर फॉलो करणे खूप महत्वाचे आहे. या काळात त्वचेला हील करण्यास वेळ मिळतो. म्हणून रात्रीच्या वेळी त्वचेची चांगली काळजी घेणे फार महत्वाचे आहे.

नाईट स्किन केअर रुटीन फॉलो करण्याचे महत्त्व
नाईट स्किन केअर रुटीन फॉलो करण्याचे महत्त्व

Night Skin Care Routine: जर तुम्ही रात्री मेकअप न काढता किंवा तुमच्या स्किन केअर रुटीन न पाळता झोपत असाल तर यामुळे तुमची त्वचा निस्तेज आणि निर्जीव दिसू लागेल. तुम्हाला रात्री एक योग्य स्किन केअर रुटीन तयार करण्यावर लक्ष देणे आवश्यक आहे. कारण ते रात्रीच्या वेळी त्वचेला नैसर्गिकरित्या हील करण्यास मदत करते. नाईट स्किन केअर रूटीन जी हायड्रेशनमध्ये मदत करते. अशा परिस्थितीत जाणून घ्या नाईट स्किन केअर का महत्त्वाची आहे आणि रूटीन कसे फॉलो करावे

का महत्त्वाची आहे नाईट स्किन केअर?

दिवसा त्वचा प्रदूषण, अतिनील किरण आणि घाण यांच्या संपर्कात असते. अशा स्थितीत रात्रीच्या वेळी तुमच्या त्वचेला नुकसान भरून काढण्याची संधी मिळते. रात्रीच्या वेळी स्किन केअर रूटीनचे पालन केल्याने त्वचा सुधारण्यास मदत होते. रात्री त्वचेमध्ये रक्त प्रवाह वाढतो, त्यामुळे त्वचेच्या पेशी जलद बरे होतात. अशा परिस्थितीत तुम्ही चांगले उत्पादन वापरणे महत्त्वाचे आहे.

कसे फॉलो करावे नाईट स्किन केअर?

स्टेप १ - मेकअप काढा

तुमचा मेकअप काढणे ही तुमच्या स्किन केअर रुटीनमधील पहिली स्टेप असावी. यासाठी सौम्य मेकअप रिमूव्हर वापरा. ज्यामुळे तुमची त्वचा कोरडी होत नाही. ऑइल बेस्ड फॉर्मुला निवडा. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही कच्चे दूध देखील वापरू शकता.

स्टेप २ - क्लिंजिंग

आपला चेहरा आणि मान स्वच्छ करण्यासाठी क्लिंजर वापरा. तुम्ही कोरियन स्किन केअर रूटीन फॉलो करू शकता .असे केल्याने छिद्र स्वच्छ होण्यास मदत होते.

स्टेप ३ - टोनर

त्वचा मऊ करण्यासाठी आणि त्याची पीएच पातळी राखण्यासाठी टोनर वापरा. टोनर विशेषतः ऑइली स्किन असलेल्या लोकांसाठी चांगले आहे. जर तुमची त्वचा ड्राय असेल तर त्वचेला हायड्रेट करण्यासाठी सॉफ्टनर वापरा.

स्टेप ४ - सीरम

सीरम वापरल्याने त्वचेच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. तुमच्या त्वचेच्या समस्येवर तुम्ही सीरम वापरू शकता. तुमच्या त्वचेच्या गरजेनुसार सीरम वापरा.

स्टेप ५- मॉइश्चरायझ करा

तुमच्या त्वचेला मॉइश्चराइझ करणे महत्त्वाचे आहे. कारण ते तुमच्या त्वचेला आवश्यक पोषक तत्वे पुरवते आणि नुकसान भरून काढण्यास मदत करते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग