Health Care: शरीर चालवायचे असेल तर ऊर्जा तर हवीच. ऊर्जा नसेल तर शरीर चालू शकत नाही तंदुरुस्त राहत नाही. ऊर्जा नसली की थकवा येतो.थकव्यामुळे चक्कर येणे, कामात रस नसणे, डोकेदुखी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. शरीरात उर्जेच्या कमतरतेमुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. निरोगी राहण्यासाठी, निरोगी लाइफस्टाईकचे पालन करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. शरीरात रक्त किंवा पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे ऊर्जा पातळी कमी होते. थकवा दूर करण्यासाठी आपल्या आहारात आरोग्यदायी गोष्टींचा समावेश करणे महत्त्वाचे आहे. तुम्ही सकाळी एक प्रकारचे ज्यूसचे सेवन केले तर खूपच फायदेशीर ठरू शकता. तुम्ही मध आणि द्राक्षाचा ज्यूस बनवून पियू शकता.
सर्व प्रथम द्राक्षे नीट धुवून घ्या.
मिक्सरच्या भांड्यात एक कप पाणी घालून द्राक्ष आणि मध एकत्र करा.
एका ग्लासमध्ये द्राक्षे आणि मध यांचे मिश्रण घाला आणि सर्व्ह करा.
> द्राक्षांमध्ये पाणी मुबलक असते जे आपल्या शरीराला हायड्रेट ठेवते.
> द्राक्षांमध्येनैसर्गिक सारखं असते, जी शरीराला ऊर्जावान ठेवण्यास मदत करते.
> पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि के समृद्ध द्राक्षे असतात. हे मेटाबॉलिज्म वाढवण्यास मदत करतात.
> शरीराची ऊर्जा वाढवण्यातही ते महत्त्वाची भूमिका बजावते.
> द्राक्षांमधील रेझवेराट्रोलसारखे अँटीऑक्सिडंट शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात. याशिवाय ते उर्जेची पातळी वाढविण्यात प्रभावी ठरतात.
> मध एक नैसर्गिक गोडवा असल्याने शरीराला भरपूर ऊर्जा पुरवण्याचे काम करते.
> मधामध्ये एन्झाईम्स, पोषक घटक आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. याचे सेवन केल्याने ऊर्जा पातळी वाढण्यास आणि पचन सुधारण्यास मदत होते.
> याच्या सेवनाने चेहऱ्याची चमक वाढते आणि त्वचेशी संबंधित समस्यांपासून सुटकारा मिळतो.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)