Health Tips: तुमच्याही शरीरात आहे प्रोटीनची कमतरता? लगेच दिसतात 'ही' लक्षणे-do you also have a protein deficiency in your body these symptoms appear immediately ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Health Tips: तुमच्याही शरीरात आहे प्रोटीनची कमतरता? लगेच दिसतात 'ही' लक्षणे

Health Tips: तुमच्याही शरीरात आहे प्रोटीनची कमतरता? लगेच दिसतात 'ही' लक्षणे

Sep 14, 2024 11:03 AM IST

Symptoms of protein deficiency: शरीरात प्रथिनांची अर्थातच प्रोटीनची कमतरता असेल तर अशी लक्षणे दिसून येतात जे वेळीच ओळखणे गरजेचे आहे.

How much protein the body needs- शरीरात किती प्रोटीन हवे
How much protein the body needs- शरीरात किती प्रोटीन हवे (freepik)

How much protein the body needs: आजकाल सगळीकडून आरोग्यदायी भोजन खाण्याचा सल्ला मिळतो. ज्यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि सूक्ष्म पोषक घटकांचा समावेश असणे आवश्यक आहे. परंतु हे सर्व असूनही, बऱ्याच लोकांच्या आहारात आवश्यक पोषक तत्वांचे पुरेसे संतुलन नसते. ज्यामुळे सर्व प्रकारच्या समस्या येऊ लागतात. विशेषत: शरीरात प्रथिनांची अर्थातच प्रोटीनची कमतरता असेल तर अशी लक्षणे दिसून येतात जे वेळीच ओळखणे गरजेचे आहे. जाणून घ्या प्रथिनांच्या कमतरतेमुळे कोणती लक्षणे आणि आजार होतात.

फॅटी लिव्हर-

फॅटी लिव्हर प्रोटीनची कमतरता दर्शवते. ज्यामध्ये यकृताच्या पेशींमध्ये चरबी जमा होऊ लागते. संशोधनात असे दिसून आले आहे की आतड्यांमधील बॅक्टेरिया आणि पेशींमध्ये बदल झाल्यामुळे लिपोप्रोटीन किंवा चरबी-वाहतूक प्रोटीन योग्यप्रकारे कार्य करत नाहीत. ज्यामुळे यकृतात चरबी जमा होऊ लागते.

शरीरावर सूज येणे-

प्रोटीनच्या कमतरतेमुळे त्वचेला सूज येते. ज्याला एडेमा असेही म्हणतात. अनेकदा महिलांमध्ये हात-पायात सूज दिसून येते. अशा स्थितीत शरीराच्या ऊतींमध्ये द्रव जमा होण्यास सुरुवात होते. याचे कारण म्हणजे रक्तात आढळणारे अल्ब्युमिन या प्रोटीनचे प्रमाण कमी असते. आणि या अल्ब्युमिनचे काम रक्तदाब राखणे आहे जे द्रव रक्ताभिसरण खेचत असते. जेव्हा प्रोटीनचे प्रमाण कमी होते, तेव्हा हे द्रव रक्ताभिसरणातून बाहेर पडत नाही आणि ऊतींमध्ये जमा होते. ज्यामुळे पाय, गुडघे आणि हातांना सूज येते.

त्वचा, केस आणि नखांमध्ये समस्या-

प्रोटीनच्या कमतरतेमुळे त्वचा, केस आणि नखांमध्ये समस्या उद्भवू लागतात. प्रोटीनच्या कमतरतेमुळे केसांची वाढ थांबते आणि त्यांचा पोतही खराब होतो. कोरडेपणा, फिकट त्वचा आणि त्वचेवर डाग दिसणे, लालसरपणा आणि ठिपके प्रोटीनची कमतरता दर्शवितात.

अशक्तपणा-

जेव्हा शरीरात प्रोटीनची कमतरता असते तेव्हा शरीर स्नायूंमधून प्रोटीन घेण्यास सुरवात करते. जेणेकरून शरीराची आवश्यक कामे करता येतील. ज्यामुळे शरीरात थकवा आणि अशक्तपणा येतो. त्यामुळे शरीरातील प्रोटीनचे प्रमाण पुरेसे असावे.

हाडे ढिसूळ होणे-

प्रोटीनच्या कमतरतेमुळे हाडांमध्ये कमकुवतपणा येतो आणि अनेकदा त्यांना फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो. २०२१ मध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार, जे लोक जास्त प्रमाणात प्रोटीन घेतात त्यांची हिप आणि मणक्याची घनता कमी प्रोटीन खाणाऱ्यांपेक्षा ६ टक्के जास्त असते. ज्यामुळे त्यांची हाडे फ्रॅक्चर होण्याची शक्यताही कमी असते.

प्रथिनांच्या कमतरतेमुळे मुलांच्या शरीराची वाढ थांबते किंवा उशीर होतो.

लठ्ठपणा वाढतो-

प्रोटीनच्या कमतरतेमुळे भूक वाढते आणि कॅलरीचे प्रमाण वाढते. आपण जितके कमी प्रमाणात प्रोटीन खाल तितके शरीर ते प्रोटीन साठवेल आणि आपल्याला अधिक प्रमाणात खाण्यास उद्युक्त करेल. ज्यामुळे लोक बऱ्याचदा जास्त कार्ब खातात आणि शरीरात लठ्ठपणा वाढतो.

 

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

Whats_app_banner