Anger Management Tips: क्रोध, राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. रागात असलेले लोक कधीकधी असे पाऊल उचलतात, ज्याचा त्या व्यक्तीला नंतर पश्चाताप होतो आणि अनेकदा नाते बिघडते. माणसाचा सर्वात मोठा शत्रू राग असतो आणि रागाच्या भरात माणूस अनेकदा असे काही बोलतो किंवा करतो, ज्यामुळे त्याला अनेकदा नाते तोडावे लागते. मानसोपचार तज्ज्ञांचे म्हणणे आहे की रागामुळे रक्तदाब आणि अन्य शाररिक समस्या होतात. यामुळे विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो आणि शारीरिक आणि मानसिक आरोग्याला अनेक प्रकारे हानी पोहोचते. जर तुम्ही अशा लोकांपैकी असाल ज्यांच्या रागाने आयुष्यातील प्रत्येक गोष्टीवर ब्रेक लावला असेल तर खाली दिलेल्या टिप्सला फॉलो करा. या टिप्स तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्यास आणि पुन्हा पुन्हा रागावण्याची सवय थांबवण्यास मदत करतील.
> जेव्हा तुम्हाला राग यायला लागतो तेव्हा काहीही बोलण्यापूर्वी १० पर्यंत आकडे मोजायला सुरू करा.
> रागाच्या भरात चुकीची प्रतिक्रिया देण्याऐवजी व्यायामाला सुरुवात करा. चालणे सुरू करा किंवा पायऱ्या चढून खाली धावा. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही रोज व्यायाम करा. जसे पोहणे किंवा चालणे.
> रागावर ताबडतोब नियंत्रण ठेवण्यासाठी, दीर्घ श्वास घ्या, काही चांगले दृश्य किंवा फोटो पहा. गाणे ऐका योग करा किंवा काहीतरी चांगले वाचायला सुरुवात करा.
> तुम्ही तुमच्या भावनांवर कधीही नियंत्रण ठेवू नये. म्हणूनच रागाच्या भरात चुकीची प्रतिक्रिया देण्याऐवजी तुमच्या जवळच्या व्यक्तीशी बोला जो तुम्हाला समजतो.
> बोलण्यापूर्वी तुम्ही काय बोलत आहात याकडे लक्ष देण्याचा सराव करा. यामुळे, रागात पटकन प्रतिक्रिया देण्याची सवय तुम्ही हळूहळू सोडाल.
> ते अनेकदा रागाच्या भरात चुकीचे बोलतात, अशा स्थितीत नाते बिघडते. जर तुम्हाला खूप राग येत असेल तर इअरबड घालून आरामदायी गाणे ऐका, ज्यामुळे तुमचे मन शांत होईल.
> चांगली झोप न मिळाल्याने व्यक्तीचा स्वभाव चिडचिड होतो, जो माणसाच्या आतून रागाच्या रूपात बाहेर पडतो, त्यामुळे पुरेशी झोप घेणे हा राग कमी करण्याचा चांगला उपाय आहे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)