Yoga Mantra: गॅस्ट्रिक असो वा ॲसिडिटीची समस्या, प्रभावी आहेत ही योगासनं, अशा प्रकारे करा
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: गॅस्ट्रिक असो वा ॲसिडिटीची समस्या, प्रभावी आहेत ही योगासनं, अशा प्रकारे करा

Yoga Mantra: गॅस्ट्रिक असो वा ॲसिडिटीची समस्या, प्रभावी आहेत ही योगासनं, अशा प्रकारे करा

Jul 10, 2024 09:52 AM IST

Yoga for Gastric Problem: जर तुम्हालाही रोज सकाळी उठल्याबरोबर पोट फुगल्यासारखे वाटत असेल तर ही योगासने तुमची मदत करतील. अॅसिडिटी, ब्लोटिंग, गॅसची समस्या दूर करण्यासाठी हे प्रभावी आहेत.

अपानासन - गॅस्ट्रिक समस्येसाठी योगासन
अपानासन - गॅस्ट्रिक समस्येसाठी योगासन (unsplash)

Yogasana for Gastric and Acidity Problem: व्यस्त जीवनशैली, खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि वर्कआऊट किंवा व्यायामाचा अभाव यामुळे बहुतांश लोकांना पोटाच्या विविध समस्या होतात. अनेक लोक अॅसिडिटी आणि गॅसच्या समस्येने त्रस्त असतात. जर तुम्हालाही रोज सकाळी उठताच पोट फुगल्यासारखे वाटत असेल तर ही योगासनं अॅसिडिटी आणि ब्लोटिंगची समस्या दूर करण्यास आणि पोटातील गॅस दूर करण्यास देखील मदत करू शकतात. ही योगासनं योग्य पद्धतीने केली तर तु्म्हाला फायदा होईल. जाणून घ्या ही योगासनं कोणती आहेत आणि ती करण्याची पद्धत.

बालासन

बालासनामुळे शरीराला आराम मिळतो आणि हळूहळू ओटीपोटाच्या अवयवांना मसाज होतो, ज्यामुळे पोटातील गॅस बाहेर पडतो. हे आसन केवळ गॅसच नाही तर मज्जासंस्था देखील शांत करून तणाव कमी करण्यास मदत करते. ज्यामुळे व्यक्तीची पचनक्रिया चांगली होते. बालासन करण्यासाठी सर्वप्रथम योगा मॅटवर गुडघ्यावर बसा. हे करत असताना आपले नितंब आपल्या गुडघ्यांवर असावेत आणि दोन्ही गुडघे समोरच्या बाजूला एकमेकांना स्पर्श करतील याची काळजी घ्या. तसेच दोन्ही पायांचे अंगठे मागच्या बाजूला एकत्र जोडलेली असावी. आता श्वास घेताना आपले दोन्ही हात वर घ्या आणि श्वास सोडताना आपले हात तोंडासमोर खाली आणा. इतके वाका की तुमचे पोट गुडघ्याला स्पर्श करेल. हे करताना मागच्या बाजूने उठणार नाही याची काळजी घ्या. आता आपले हात थोडा वेळ पुढे पसरवा. नंतर श्वास घेताना पुन्हा वरच्या दिशेने उठा आणि श्वास सोडताना हात ध्यानावस्थेत घ्या. असे केल्याने तुमचा एक सेट पूर्ण होतो. असे साधारण ३ ते ४ सेट करा.

अपानासन

अपानासनामुळे तुमच्या पोटावर थेट दाब पडतो, ज्यामुळे पोटातील गॅस बाहेर पडण्यास मदत होते. पोटाच्या इतर भागांना हलका मसाज करताना हे आसन अस्वस्थता आणि ब्लोटिंगची समस्या दूर करण्यास किंवा कमी करण्यास मदत करते. अपानासन करण्यासाठी सर्वप्रथम जमिनीवर योगा मॅटवर सरळ पाठीवर झोपा. यानंतर आपले दोन्ही गुडघे वरच्या बाजूला वाकवा. हे करत असताना श्वास सोडताना दोन्ही गुडघे छातीशी जोडण्याचा प्रयत्न करा. आता दोन्ही हातांनी गुडघे नीट धरून ठेवा. हे करत असताना आपले खांदे जमिनीवर आहेत याची विशेष काळजी घ्या. या आसनात थोडा वेळ रहा आणि नंतर श्वास घेताना सामान्य स्थितीत परत या.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner