मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Cholesterol Control: या ५ गोष्टी सकाळी करा, कमी होईल खराब कोलेस्ट्रॉल!

Cholesterol Control: या ५ गोष्टी सकाळी करा, कमी होईल खराब कोलेस्ट्रॉल!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 29, 2024 11:48 AM IST

Bad Cholesterol: खराब कोलेस्टेरॉलमुळे केवळ एकच नाही तर आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात.

Cholesterol Problem
Cholesterol Problem (freepik)

High Cholesterol Home Remedies: शरीराला योग्यरित्या काम करण्यासाठी कोलेस्टेरॉलची असणे आवश्यक आहे. पण जेव्हा कोलेस्टेरॉल जास्त प्रमाणात वाढते तेव्हा आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवतात. खराब कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा आणू लागते, ज्यामुळे रक्ताचा प्रवाह योग्यरित्या होण्यास त्रास होतो. खराब कोलेस्टेरॉल शरीरात जमा होऊ लागते. यामुळे हातपाय दुखणे, हृदयविकाराचा झटकाही येतो. काही रोजच्या सवयी, लाइफस्टाइलमधील बदल आणि आहारातील बदल हे खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यास उपयुक्त ठरतात. चला जाणून घेऊयात शरीरात जमा झालेले खराब कोलेस्ट्रॉल कसे कमी करता येईल.

नाश्ता कसा असावा?

नाश्त्यामध्ये असे पदार्थ घ्या जे कोलेस्ट्रॉल मॅनेजमेंट करण्यास उपयुक्त ठरतील. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी धान्य, फळे, भाज्या आणि ताज्या गोष्टींचा समावेश केला जाऊ शकतो ज्यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. फायबर समृद्ध नाश्ता कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उत्तम ठरतो.

Hand skin tighten tips: हातांची त्वचा सैल आणि निर्जीव झालीये? या टिप्स फॉलो करा!

गरम पाण्याने करा दिवसाची सुरुवात

दिवसाची सुरुवात गरम पाणी पिऊन करावे. सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यायल्यास पचनक्रिया सुधारते. याशिवाय कोलेस्ट्रॉल कमी होण्याचाही परिणाम दिसून येतो. लिंबूमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते जे एलडीएल म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यात प्रभावी आहे.

Arthritis: ऑस्टियोआर्थरायटिस पासून बचाव करण्यासाठी या सवयी टाळा!

ग्रीन टी

सकाळी चहा ऐवजी ग्रीन टी प्या. ग्रीन टीमध्ये भरपूर अँटी-ऑक्सिडंट असतात. जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात. एक कप ग्रीन टी शरीराला एकच नाही तर अनेक फायदे देतो. यामुळे मेटाबॉलिज्म वाढतो आणि वजन कमी होते.

Roasted fox nut : भाजलेले मखाणा खाण्याचे मिळतात 'हे' फायदे, आहारात आवर्जून करा समावेश!

व्यायाम आहे गरजेचा

रोज सकाळी थोडा व्यायाम करावा. यामुळेही कोलेस्ट्रॉल कमी करता येऊ शकते. अर्धा तास कमी तीव्रतेचा व्यायाम किंवा सायकलिंग, चालणे आणि कार्डिओ हे आवर्जून करा. यामुळे रक्तात साचलेले घाणेरडे कोलेस्टेरॉल कमी होऊ लागते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel