Yoga Mantra: पोटाची चरबी झटपट होईल कमी, फक्त रोज करा ही ३ योगासनं, मिळतील इतरही फायदे
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: पोटाची चरबी झटपट होईल कमी, फक्त रोज करा ही ३ योगासनं, मिळतील इतरही फायदे

Yoga Mantra: पोटाची चरबी झटपट होईल कमी, फक्त रोज करा ही ३ योगासनं, मिळतील इतरही फायदे

Published Jun 20, 2024 08:37 AM IST

Yoga for Belly Fat: पोटावर जमा झालेली चरबी कमी करणे मोठे अवघड काम आहे. तुमच्या पोटावरची चरबी कमी करायची असेल तर या योगासनांची मदत घ्या.

पोटाची चरबी कमी करण्यासाठी योगासन
पोटाची चरबी कमी करण्यासाठी योगासन

Yoga Poses to Reduce Belly Fat: वाढलेले वजन कमी करणे जेवढे अवघड वाटते त्यापेक्षा जास्त अवघड काम पोटाची चरबी कमी करणे आहे. पोटावर जमा झालेली चरबी म्हणजेच बेली फॅट हे फक्त तुमचे लूक खराब करत नाही तर ते अनेक आजारांना निमंत्रण देखील देते. जर तुम्हाला सुद्धा पोटाची चरबी कमी करायची असेल तर तुम्ही या काही योगासनांची मदत घेऊ शकता. हे योगासन रोज केल्याने तुम्ही वजन कमी करण्यासोबतच पोटाची चरबी सुद्धा कमी करू शकता. हे योगासन कोणते आहेत आणि ते कसे करावे हे जाणून घ्या.

भुजंगासन

या आसनामध्ये तुम्हाला तुमचे धड सापाप्रमाणे पुढच्या दिशेने उचलावे लागते. त्यामुळे याला कोब्रा पोझ असे देखील म्हणतात. पोटाशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास दररोज भुजंगासन करा. हे एक उत्तम आसन म्हटले जाते, जे पोटाची चरबी कमी करण्यास आणि पोटाला टोन करण्यास मदत करू शकते. जर तुम्ही तुमच्या फिटनेस रुटीनमध्ये योगाचा समावेश केला आणि निरोगी आहाराचे पालन केले तर ते तुम्हाला तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करू शकते.

विरभद्रासन

या आसनला इंग्रजीत वॉरियर्स पोज असे म्हणतात. विरभद्रासनामुळे पाठीचा खालचा भाग, पाय आणि हात टोन होण्यासोबतच शरीराचे संतुलनही सुधारते. यामुळे ओटीपोटावर थोडा ताण पडतो, ज्यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास आणि पोट सपाट होण्यास मदत होते. हे आसन केल्याने वजन सुद्धा कमी होते. ज्या महिलांच्या पोटावर चरबी आहे, त्यांच्यासाठी हे आसन खूप उपयुक्त आहे. यासोबतच शरीरातील अतिरिक्त चरबीही कमी होते.

चतुरंग दंडासन

तुमचे पोट मजबूत करण्यासाठी हे सर्वोत्तम आसन आहे. हे करायला सुद्धा खूप सोपे आहे. याला साध्या शब्दात प्लँक पोझ असेही म्हणतात. जेव्हा तुम्हाला पोटाच्या स्नायूंमध्ये त्याची तीव्रता जाणवू लागते तेव्हा त्याचा प्रभाव दिसून येतो. हे आसन पोटाची चरबी करण्यासाठी प्रभावी आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner