Hair Care: हेअर स्ट्रेटनर कसं वापरायचं समजत नाहीये? फॉलो करा या टिप्स!-do not understand how to use a hair straightener follow these tips ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Hair Care: हेअर स्ट्रेटनर कसं वापरायचं समजत नाहीये? फॉलो करा या टिप्स!

Hair Care: हेअर स्ट्रेटनर कसं वापरायचं समजत नाहीये? फॉलो करा या टिप्स!

Feb 01, 2024 01:17 PM IST

Hair Styling Tips: जर तुम्ही घरी हेअर स्ट्रेटनर वापरत असाल तर ते नक्की योग्य प्रकारे कसे वापरायचे हे माहित असले पाहिजे. नाही तर केसांचे नुकसान होते.

Beauty Tips
Beauty Tips (philips india)

Hair Straightener: कपड्यांसोबत हेअर स्टायलिंग करणे गरजेचे आहे. हेअरस्टाईल चांगली नसेल तर संपूर्ण लुक खराब होतो. स्ट्रेट हेअर फार ट्रेंडमध्ये आहेत. रोजच्या वापरासाठी किंवा पार्टीत तुम्ही या प्रकारची हेअरस्टाईल सहज कॅरी करू शकता. केस स्ट्रेट करण्यासाठी पार्लरमध्ये जावं लागायचं परंतु, आता बाजारात अनेक प्रकारचे हेअर स्ट्रेटनर उपलब्ध आहेत, जे वापरण्यास अतिशय सोपे आहेत. आजकाल अनेक महिलांना घरी हेअर स्ट्रेटनर वापरून परफेक्ट लूक मिळवायचा असतो. पण कधी कधी हवा तसा लूक मिळत नाही. यासाठी हेअर स्ट्रेटनरचा योग्य वापर कसा करायचा ते जाणून घ्या.

केसांना करा तयार

हेअर स्ट्रेटनर वापरण्याचा विचार करत असाल, तर त्याच्यासाठी केस तयार करणे महत्त्वाचे आहे. यासाठी सर्वात आधी केस धुवा. याशिवाय कंडिशनरचाही वापर करावा. स्वच्छ केसांमुळे कमीत कमी नुकसान होते.

हीट प्रोटेक्शन स्प्रे

केस धुतल्यानंतर आणि कोरडे केल्यानंतर, हेअर स्ट्रेटनर वापरण्याआधी हीट प्रोटेक्शन स्प्रे वापरा. ही स्टेप कधीहीच स्किप करू नका. हीट प्रोटेक्शन स्प्रे खरोखर उष्णता आणि तुमचे केस यांच्यातील लेअर म्हणून काम करते आणि अति उष्णतेमुळे तुमच्या केसांचे रक्षण करते.

सेक्शन करा

अनेकदा हेअर स्ट्रेटनर वापरूनही परफेक्ट लुक मिळत नाही. याच एक कारण असे की केसांना सेक्शन न करता हेअर स्ट्रेटनर वापरणे. यासाठी निट सेक्शन करूनच हेअर स्ट्रेट करा.

तापमान सेट करा

हेअर स्ट्रेटनरमधून परफेक्ट लूक मिळविण्यासाठी, त्याच योग्य तापमान सेट करणे महत्त्वाचे आहे. आजकाल बाजारात उपलब्ध असलेल्या बहुतेक हेअर स्ट्रेटनरमध्ये तापमान सेट करण्याची सुविधा असते. हेअर स्ट्रेटनरचे तापमान तुमच्या केसांवर अवलंबून असते. योग्य तापमान ठेवल्यास नीट केस व्यवस्थित सरळ होतील.

हे हेअर स्ट्रेटनर ठरेल उत्तम

फिलिप्स इंडियाने नुकतचं नरीशकेअर टेक्नॉलॉजीसह रिव्होल्युशनरी हेअर स्ट्रेटनर लॉंच केले आहे. हे देशातील पहिले हेअर स्ट्रेटनर जे हीटचे नुकसान न करता स्टाईल करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. हे नरीशकेअर तंत्रज्ञानासह हेअर स्ट्रेटनर आहे. या अनोख्या स्ट्रेटनरमध्ये केसांना पोषण देणारे घटक, व्हिटॅमिन ई आणि मोरोक्कन आर्गन ऑइल आणि केराशाइन केअरसह विशेषतः डिझाइन केलेल्या सीरम स्ट्रिप्सचा समावेश आहे जो केसांना हीटचे नुकसान होऊ न देता स्टाइल आणि पोषण करण्यास मदत करतो. हे तंत्रज्ञान सामान्यत: उष्णतेमुळे नष्ट होणारी आर्द्रता बंद करते आणि केसांना पोषक, निरोगी दिसण्यास मदत करते.

विभाग