मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  कोरोनाचा Booster Dose घेऊ नका; जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

कोरोनाचा Booster Dose घेऊ नका; जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 20, 2022 08:10 AM IST

कोरोनाचा बूस्टर डोस हा कोरोना रुग्णावर अत्यंत प्रभावी आणि परिणामकारक ठरत असल्याचा दावा करण्यात येत असतानाच आता जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाचा बूस्टर डोस घेऊ नका, असा इशारा दिला आहे.

Booster Dose
Booster Dose (HT)

Health Breaking : कोरोना महामारीसंदर्भातील नियमावली जरी अनेक देशांनी मागे घेतलेली असली तरीदेखील अजून कोरोना महामारीचा प्रभाव अजून पूर्णपणे संपलेला नाही. याशिवाय काही महिन्यांच्या अंतरानं विविध कोरोना व्हेरियंट्स सापडत असल्यानं तज्ज्ञांच्या आणि लोकांच्या चिंता वाढताना दिसत आहे. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून भारतासह जगभरात कोरोनाच्या बूस्टर डोसची फार चर्चा होत आहे. यात आता भारत सरकारनं देखील लोकांना कोरोनाचा बूस्टर डोस घेण्याचं आवाहन केलेलं आहे.

ज्या लोकांना कोरोनाचा धोका फार जास्त आहे किंवा त्यांना लागण झालेली आहे, अशा लोकांनी कोरोनाचा बूस्टर डोस घ्यायला हवा, असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे. परंतु आता जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाच्या बूस्टर डोसबद्दल अजून एक नवी माहिती जारी केली आहे. ज्यात तरुणांना कोरोनाचा बूस्टर डोस घेण्याची गरज नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

तरूणांनी कोरोनाचा बूस्टर डोस घेण्याची गरज नाही...

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या बूस्टर डोस बाबत जागतिक आरोग्य संघटनेनं सात अभ्यासांचा डेट्याद्वारे माहिती घेण्यात आली होती. त्यात कोरोनाच्या बूस्टर डोसचा तरुणांना फायदा होईल, असा कोणताही पुरावा सापडलेला नाही. याशिवाय ज्या लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे, किंवा या व्हायरसमुळं त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे, अशा लोकांना कोरोनाचा बूस्टर डोस घ्यायला हवा, असंही जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे. याशिवाय काही श्रीमंत देशांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या बूस्टर डोसचा साठा तथा लसीकरण झालेलं आहे, त्या तुलनेत गरिब देशांमध्ये याचं प्रमाण फार कमी असल्यानं याबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं चिंता व्यक्त केली आहे.

त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी तरुणांना कोरोनाचा बूस्टर डोस देणाऱ्या देशांवर जागतिक आरोग्य संघटनेनं टीका केली होती. त्यामुळं तरुणांना कोरोनाचा बुस्टर डोस घेणं गरजेचं नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel