World Environment Day 2023: पर्यटन स्थळांचे वातावरण करू नका खराब! संवर्धनासाठी हे करा
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  World Environment Day 2023: पर्यटन स्थळांचे वातावरण करू नका खराब! संवर्धनासाठी हे करा

World Environment Day 2023: पर्यटन स्थळांचे वातावरण करू नका खराब! संवर्धनासाठी हे करा

Updated Jun 05, 2023 07:29 PM IST

Travel: पर्यटन स्थळांच्या पर्यावरणाचे जतन आणि संरक्षण करण्यासाठी पर्यटकांनी ट्रिपदरम्यान काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे.

जागतिक पर्यावरण दिन
जागतिक पर्यावरण दिन (Pixabay)

World Environment Day 2023: जागतिक पर्यावरण दिन ५ जून रोजी साजरा केला जातो. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. भारत आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे अनेक सुंदर पर्यटन स्थळे, नद्या, टेकड्या, तलाव आणि धबधबे आहेत, ज्यांना प्रत्येक हंगामात पर्यटक भेट देतात. भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळाची सुंदर दृश्ये आणि नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी लोक लांबून पोहोचतात. इको-टूरिझमचे अनेक पर्याय भारतात आहेत. मात्र, टुरिस्ट त्या जागा खराब करत आहेत. या पर्यटन स्थळांच्या पर्यावरणाचे जतन आणि संरक्षण करण्यासाठी पर्यटकांनी ट्रिपदरम्यान काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. इको-टुरिझम स्थळांच्या संवर्धनाच्या पद्धती जाणून घ्या.

नद्या आणि तलाव दूषित होण्यापासून वाचवा

तुम्ही प्रवासाला जाता तेव्हा तेथे असलेल्या नद्या, धबधबे किंवा तलाव स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. अनेकदा धबधबे आणि तलाव पर्यटकांना आकर्षित करतात, तथापि, वस्तू, कापड, प्लास्टिक, पॉलिथिन इत्यादी नद्यांमध्ये फेकून, जलचरांचे नुकसान करतात. यासोबतच या नद्या आणि तलावांचे नैसर्गिक सौंदर्यही बिघडते.

कचरा टाकू नका

बर्‍याचदा प्रवासी ट्रेकिंगसाठी आणि कॅम्पिंगसाठी राष्ट्रीय उद्यान, हिरव्या टेकड्यांवर जातात, परंतु या दरम्यान ते कचरा तेथेच टाकतात. ते खाण्यापिण्याचे साहित्य सोबत घेऊन जातात मात्र प्लास्टिक, पॉलिथिन इत्यादी उघड्यावर टाकतात, त्यामुळे घाण पसरते. या कचऱ्यापासून बागेतील जनावरांनाही धोका आहे.

वाहन प्रदूषण नियंत्रण

आजच्या तरुणांना रोड ट्रिप खूपच रोमांचक वाटतात. ते वाहनाने प्रवासाला जातात. डिझेल पेट्रोलच्या या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. प्रदूषणामुळे पर्यावरणाची हानी होते. स्वच्छतेसाठी आणि निरोगी वातावरणासाठी, इको-टुरिझम स्थळी जाताना ट्रेनने प्रवास करा. वाहनांच्या गुणवत्तेची काळजी घ्या आणि हवा प्रदूषित होण्यापासून वाचवा.

पर्यावरणाची हानी

आपण उद्याने, जंगले किंवा कोणत्याही पर्यावरणीय ठिकाणी गेलो तर तेथे छोटे प्राणी आढळतात. लोक त्यांच्या मौजमजेसाठी या प्राण्यांना इजा करतात. हरणासारख्या प्राण्यांची शिकार करणारे अनेक तस्कर किंवा गुन्हेगार आहेत. त्यामुळे पर्यावरणाचीही हानी होते.

Whats_app_banner