मराठी बातम्या  /  Lifestyle  /  Do Not Ignore These Things In The Call Of Making Money Chanakya Niti

Chanakya Niti: पैसे कमवण्याच्या नादात या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!

चाणक्य नीती
चाणक्य नीती
Tejashree Tanaji Gaikwad • HT Marathi
May 28, 2023 06:04 AM IST

Acharya Chanakya: आचार्य चाणक्य यांनी नीती शास्त्रामध्ये जवळपास प्रत्येक क्षेत्राशी संबंधित गोष्टींचा उल्लेख केला आहे.

Chanakya Niti: जगातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसा. जगण्यासाठी आपल्याकडे पैसा असणे सर्वात महत्वाचे आहे. पैशाने एखादी व्यक्ती त्याला आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट खरेदी करू शकते. पैसा मिळवण्यासाठी लोक रात्रंदिवस मेहनत करतात. पण पैशाच्या मागे तेवढेच धावले पाहिजे जेवढे आवश्यक आहे. कारण पैसा पुन्हा कमावता येतो, पण त्याच्या नादात अनेक वेळा अशा गोष्टी मागे राहतात ज्या पैशापेक्षा जास्त मौल्यवान असतात.

ट्रेंडिंग न्यूज

प्रेम महत्त्वाचे

आयुष्यात जेवढी पैशाची गरज असते, तेवढीच गरज प्रेमाचीही असते. दोन्ही जगण्यासाठी खूप महत्वाचे आहेत. पैशामुळे तुमच्या प्रेमाकडे कधीही दुर्लक्ष करू नका आणि प्रेमाला पैशाने तोडू नका. काहीजण पैशाच्या मागे धावत कुटुंब सोडतात तर काही प्रेमासाठी संपत्ती सोडतात. नातेसंबंधांमध्ये पैसा कधीही येऊ नये. कारण माणूस कितीही श्रीमंत असला तरी प्रेम कधीच विकत घेऊ शकत नाही.

स्वाभिमानाशी तडजोड करू नका

आचार्य चाणक्य म्हणतात की व्यक्तीने कधीही त्याच्या स्वाभिमानाशी तडजोड करू नये. स्वाभिमानासाठी माणसाला पैशाचा त्याग करावा लागला तरी त्याने कधीही मागे हटू नये.कारण आपल्या क्षमतेच्या आणि मेहनतीच्या जोरावर माणूस पुन्हा पैसा कमवू शकतो. पण एकदा तो स्वतःच्या नजरेत पडला की परत कधीच उठू शकत नाही.

पैशापेक्षा धर्म मोठा

आचार्य चाणक्य म्हणतात की धर्म माणसाला बरोबर चूक ओळखायला शिकवतो. म्हणूनच माणूस कोणत्याही धर्माचा असो, त्याने नेहमीच आपला धर्म पैशाच्या वर ठेवला पाहिजे. पैसा मिळविण्यासाठी जर एखाद्या व्यक्तीने धर्माचा त्याग केला तर त्याची समाजातील प्रतिष्ठा संपते. असा धर्म नसलेला माणूस वाईट मार्गाचा अवलंब करून लवकरच आपले जीवन उध्वस्त करतो.

(Disclaimer : येथे प्रदान केलेली माहिती केवळ गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. येथे नमूद करणे महत्त्वाचे आहे की 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' कोणत्याही प्रकारच्या ओळखीची, माहितीची पुष्टी करत नाही.)

WhatsApp channel