Mental Health: कौतुकामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटते का? हे असू शकते कारण!-do compliments make you uncomfortable know reason ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Mental Health: कौतुकामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटते का? हे असू शकते कारण!

Mental Health: कौतुकामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटते का? हे असू शकते कारण!

Jan 25, 2024 01:16 PM IST

Personal Care: खूप जास्त अपेक्षा ठेवण्यापासून ते टीकेपर्यंत अशा काही कारणांमुळे कौतुकामुळे आपल्याला अस्वस्थ वाटू शकते. याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात

Do compliments make you feel uncomfortable
Do compliments make you feel uncomfortable (Unsplash)

Compliments make you uncomfortable: आपलं कौतुक आपली प्रशंसा कोणाला आवडत नाही. जेव्हा आपलय आवडत्या लोकांकडून प्रशंसा केली जाते, तेव्हा आपल्याला जास्त छान वाटते. तर कधीकधी, काहींना कौतुक मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागू शकतो. पण तुम्हाला हे माहित आहे का की काहींना कौतुक स्वीकारण्यासाठीही संघर्ष करावा लागतो. कौतुक होत असल्याने एखाद्याला चिंता वाढल्यासारखे वाटणे, कौतुक नाकारणे किंवा लक्ष विचलित होणे अशा गोष्टी होतात. असं मानसोपचारतज्ज्ञ एमिली एच सँडर्स इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहले. प्रशंसा मिळाल्याने आपल्याला अस्वस्थ वाटू शकते. होय बरोबर वाचले. याची नक्की काय कारणे असतात याबद्दल जाणून घेऊयात.

टीका करण्याची सवय

जेव्हा आपण अकार्यक्षम घरात वाढतो, तेव्हा आपल्याला नेहमीच टीका करण्याची सवय होते. अशावेळी जर कोणी आपलं कौतुक केलं तर ते आपल्याला नकोस वाटू शकते.

स्वतःबद्दलच्या अपेक्षा

आपण बऱ्याचदा स्वतःसाठी इतक्या मोठ्या अपेक्षा ठेवतो की आपणच त्यांच्याशी कधीच जुळवून घेऊ शकत नाही. यामुळे आपण स्वतःहा चांगले नाहीये असं वाटतं . त्यामुळे जेव्हा दुसरं कुणी आपलं कौतुक करतं, तेव्हा आपण ते स्वीकारायला तयार होत नाही.

अटेन्शन आवडत नाही

काही लोकांमध्ये सुरक्षिततेसाठी असो किंवा लोकांना खूश करण्यासाठी, स्वत:ला लहान वाटून घेण्याची प्रवृत्ती बळावते करतो. त्यामुळे एखादे कौतुक जेव्हा आपल्या वाट्याला येते, तेव्हा आपण ते घेऊ शकत नाही कारण त्यासोबत येणारे अटेन्शन आपल्याला आवडत नाही.

सेल्फ सेंटर होण्याची भीती

कौतुक ऐकल्यावर आपल्याला स्वतःचा खूप अभिमान वाटू शकते. यामुळे हळू हळू आपण सेल्फ सेंटर अर्थात आत्मकेंद्रित होण्याची भीती काहींना वाटते. यामुळे अनेकजण कौतुक नाकारण्याचा प्रयत्न करतो.

विश्वास नसणे

ज्याला विश्वास ठेवणे कठीण जाते ते कौतुक घेऊ शकत नाहीत. कारण विश्वास नसल्यामुळे कौतुक खरे आहे की नाही हे समजून घेणे आपल्याला कठीण जाते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)