Flex Seeds Hair Mask For Silky Hair: मऊ, रेशमी आणि सिल्की केस कोणाला आवडत नाही. हे आपलं सौंदर्य वाढवू शकतात. आजकाल लोकांना सरळ सॉफ्ट केस फार आवडतात. यासाठी अनेक प्रकारची उत्पादने वेगवेगळ्या बाजारात उपलब्ध आहेत. केसांना रेशमी बनवण्यासाठी शॅम्पूपासून कंडिशनर आणि हेअर मास्कपासून सीरमपर्यंत सर्व गोष्टींचा वापर केला जातो. पार्लरमध्ये हेअर स्पा, प्रोटीन ट्रीटमेंट आणि हेअर कॅरोटीनने केसांना सिल्की बनवले जाते. जर तुम्हाला बाहेर जाऊन हे करायचं नसेल तर तुम्ही घरच्या घरी सहजपणे केसांना रेशमी बनवू शकता. यासाठी जवसाच्या बियापासून बनवलेले जेल उपयुक्त करू शकता. यामुळे कोरडे झालेले केस पूर्णपणे मऊ होतील. चला जाणून घेऊया जवसाच्या बियापासून हेअर मास्क कसा तयार करायचा?
> हा हेअर मास्क तयार करण्यासाठी १ कप जवसाच्या बिया घ्या.
> एका कढईत जवसाच्या बिया टाका आणि साधारण २ कप पाणी घालून उकळायला ठेवा.
> जेव्हा जवसाच्या बिया जेलसारखे पाणी सोडतात तेव्हा गॅस बंद करा आणि जेल कापडात टाकून बाहेर काढा.
> कापड पिळून शक्य तितके जेल काढण्याचा प्रयत्न करा.
> आता जवसाच्या बियामधून एकदा वापरण्यात येणारे जेल काढा आणि त्यात ५ ते ६ व्हिटॅमिन-ई कॅप्सूल मिसळा.
> आता त्यात १ टेबलस्पून एरंडेल किंवा बदाम तेल घाला.
> या सर्व गोष्टी नीट मिसळा आणि ओल्या केसांना संपूर्ण लांबीपर्यंत लावा.
> सुमारे ४५ मिनिटे ते १ तास केसांवर जेल राहू द्या. आपले केस शॉवर कॅपने झाकून ठेवा.
> यानंतर, केस सौम्य शाम्पूने किंवा फक्त पाण्याने धुवा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या