आजच्या काळात मोबाईल फोन हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक खास भाग बनला आहे. आपलं मनोरंजन करायचं असो की ऑनलाइन शॉपिंग, सगळीकडे फोनचा वापर केला जातो. आता मोबाईल फोन इतका महत्वाचा झाला आहे, त्यामुळे त्याची विशेष काळजी घेणंही खूप गरजेचं आहे. त्यामुळे फोन तुटू नये आणि थोडा ट्रेंडी लूक मिळावा यासाठी तो झाकून ठेवला जातो. मात्र, फॅशन ट्रेंडसोबत मोबाइल कव्हरचा ट्रेंडही खूप वेगाने बदलतो.
आजकाल पर्सनलाइज्ड फोटो असलेल्या मोबाईल कव्हरला सर्वाधिक मागणी असल्याचे पाहायला मिळते. अनेकांना असे कव्हर आवडतात देखील. बाजारात या कव्हरची किंमतही खूप जास्त आहे. चला तर मग पाहूया घर बसल्या हे कव्हर बनवण्याचा सोपा मार्ग...
फोटो असलेले फोन कव्हर तयार करण्यासाठी तुम्हाला काही बेसिक गोष्टींची गरज भासणार आहे. यासाठी तुम्हाला पारदर्शक फोन कव्हरची गरज आहे. यासोबतच फोनच्या कव्हरच्या आकाराचा फोटोही लागणार आहे. लक्षात ठेवा की आपला फोटो हीट ट्रांसफर प्रिंटिंग पेपरवर असायला हवा. तुम्ही कोणत्याही फोटोच्या दुकानात जाऊन आवडीच्या फोटोची या पेपरावर प्रिंट काढून घेऊ शकता. ही प्रिंट अतिशय स्वस्त दरात मिळेल. याशिवाय तुम्हाला फोटो कव्हरवर चिटकवण्यासाठी इस्त्री आणि A4 साईजच्या पेपरची गरज भासणार आहे.
वाचा: किचन सिंक वारंवार ब्लॉक होत असेल तर जाणून घ्या कसे साफ करावे, वाचा सोप्या टिप्स
फोटो असलेले फोन कव्हर तयार करण्यासाठी सर्वप्रथम पारदर्शक मोबाइल कव्हर घ्या. आता टेपच्या साहाय्याने त्याच्या मागच्या भागावरील हीट ट्रांसफर प्रिंटिंग पेपरवर काढलेला फोटो चिकटवा. त्यावर ए ४ आकाराचा कागद ठेवा. आता हलक्या गरम झालेल्या इस्त्रीच्या साहाय्याने सुमारे २ मिनिटे या पेपरवर जोर द्या. यानंतर एका मोठ्या भांड्यात थंड पाणी घेऊन त्यात कागदासहीत फोनचे कव्हर बुडवावे. साधारण ३० मिनिटे हे कव्हर पाण्यात ठेवा. त्यानंतर ते कव्हर पाण्यातून बाहेर काढून हळुवारपणे आवरणावर असलेला कागद चोळा. हळूहळू तो कागद चोळून काढून टाका. मोबाईल कव्हरवर तुमचा फोटो चिकटल्याचे तुम्हाला दिसेल. अशा प्रकारे घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही फोटो असलेले मोबाईल कव्हर बनवू शकता.
संबंधित बातम्या