Besan Ladoo Recipe: दिवाळीचा फराळ बेसनाच्या लाडूशिवाय अपूर्ण आहे. फराळ म्हटलं की बेसनाच्या लाडूचा विचार पहिले येतो. अवघ्या काही दिवसांवर दिवाळी आली असून, घरोघरी महिला फराळाचे पदार्थ बनवत आहेत. चिवडा, चकली, करंजी यासोबतच फराळामध्ये बेसनाचे लाडू आवडीने खाल्ले जातात. अनेक महिलांना घरी बेसनाचे लाडू बनवणे कठीण काम वाटते. तुम्हालाही असेच वाटत असेल तर तुम्ही शेफ रणवीर ब्रारची ही रेसिपी ट्राय करू शकता. चला तर मग वाट कसली पाहताय जाणून घ्या घरी सोप्या पद्धतीने कसे बनावयचे बेसनाचे लाडू.
- २ कप बेसन
- १/२ कप तूप
- १ कप बारीक केलेली साखर
- १/२ टीस्पून वेलची पूड
- २ टीस्पून बारीक केलेले बदाम (ऐच्छिक)
- गार्निशिंगसाठी ड्राय फ्रूट्स
बेसनाचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम एका खोल नॉनस्टिक कढईमध्ये तूप टाका आणि गरम करा. आता त्यात बेसन घाला. आता ते मध्यम आचेवर नीट भाजा. बेसनचा रंग थोडा तपकिरी होत नाही आणि त्यातून सुंदर येत नाही तोपर्यंत हे नीट भाजत राहा. लक्षात ठेवा भाजताना सतत ढवळत राहा. अन्यथा बेसन एखाद्या जागी चिकटून करपू शकते आणि तो वास लाडूला लागू शकतो. त्यामुळे मध्यम किंवा मंद आचेवर बेसन चांगला भाजून घ्या. बेसन भाजून झाल्यावर गॅस बंद करा आणि ते थंड होण्यासाठी कढई बाजूला ठेवा. आता त्यात बारीक केलेली साखर, वेलची पूड आणि बारीक केलेले बदाम टाका. तुम्हाला बदाम नको असेल तर तुम्ही ते स्किप करू शकता. आता हे बेसन दोन्ही हातांनी चोळून मिक्स करा. हे मिश्रण जोपर्यंत कुरकुरीत टेक्सचर येत नाही तोपर्यंत चांगले तळहातांमध्ये घासून चोळावे.
आता याचा थोडा भाग घ्या आणि त्याला लाडू बनवण्यासाठी गोल आकारात दाबा. असेच सर्व लाडू तयार करुन घ्या. तुम्ही हे असेच ठेवू शकता. किंवा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यावर एक एक बदाम किंवा काजू लावून गार्निश करू शकता.
संबंधित बातम्या