Diwali Gifts Ideas: दिवाळी हा वर्षातील सर्वात मोठा सण आहे. या दिवशी प्रभू राम, माता सीता आणि लक्ष्मण १४ वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतले होते, असे म्हणतात. या दिवशी लोक लक्ष्मीची पूजा करतात आणि एकमेकांना भेटवस्तू देतात. सर्वजण हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करतात. आता हा सण जवळ आला असून सर्वांनी उत्सवाची जय्यत तयारी केली आहे. या दिवसापूर्वी एकमेकांना भेटवस्तू देण्याची प्रक्रिया सुरू होते. तुम्हीही तुमच्या प्रियजनांना देण्यासाठी स्वस्त आणि चांगल्या गोष्टी शोधत असाल, तर येथे काही उत्तम पर्याय आहेत.
हिवाळा सुरू होणार आहे आणि अशा परिस्थितीत उबदार ब्लँकेटपेक्षा चांगली भेटवस्तू कोणती असू शकते. तुम्ही तुमच्या प्रियजनांना रंगीबेरंगी ब्लँकेट भेट देऊ शकता. बाजारात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या ब्लॅंकेट मिळतील. विशेष म्हणजे हे ब्लँकेट फक ५०० रुपयांपासून सुरू होतात.
कप आणि बशी देखील खूप चांगली भेटवस्तू ठरू शकते. विशेषत: ज्यांना विविध प्रकारच्या क्रोकरीच्या गोष्टी आवडतात. सुरेख डिझाइन असलेला कप आणि बशी ४०० रुपयांपासून सुरू होतात.
तुम्ही गिफ्ट म्हणून काचेचे ग्लासदेखील देऊ शकता. ही एक उत्तम भेट आहे जी प्रत्येकासाठी उपयुक्त ठरेल. आजकाल विविध प्रकारचे ग्लास देखील उपलब्ध आहेत, त्यापैकी डान्सिंग ग्लास खूप चर्चेत आहे.
ज्या व्यक्तीसाठी तुम्ही गिफ्ट खरेदी करत आहात ती व्यक्ती खाण्यापिण्याची शौकीन असेल, तर तुम्ही त्याच्यासाठी खाद्यपदार्थांचा हॅम्पर तयार करू शकता. त्यांच्या आवडीच्या वस्तूंसह तुम्ही ते बनवू शकता.
एक चांगला शो पीस देखील एक उत्तम भेटवस्तू ठरू शकतो. घराच्या सजावटीसाठी तुम्ही चांगली वस्तू खरेदी करू शकता. तुम्हाला हे देखील ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळेल.
अलीकडच्या काळात स्किन केअर बाबत प्रत्येक व्यक्ती प्रचंड सजग झाली आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींना स्किन केअर किट देऊ शकता. यामध्ये तुम्ही हिवाळाच्या दृष्टीने मॉइश्चरायझरसारखे प्रॉडक्ट ठेऊ शकता.
अनेक महिलांना काचेच्या भांड्यांची प्रचंड आवड असते. अशावेळी तुम्ही तुमच्या फिमेल फ्रेंड्सना डिनर सेट देऊ शकता. सध्या बाजारात विविध किंमतीमध्ये आणि आकर्षक डिझाइन्समध्ये डिनर सेट उपलब्ध आहेत. शिवाय तुम्ही ऑनलाईनसुद्धा मागवू शकता.
(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )