Diwali Faral Recipe: दिवाळीला बनवा जाळीदार, मऊसूत अनारसे, अगदी सोपी आहे रेसिपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Diwali Faral Recipe: दिवाळीला बनवा जाळीदार, मऊसूत अनारसे, अगदी सोपी आहे रेसिपी

Diwali Faral Recipe: दिवाळीला बनवा जाळीदार, मऊसूत अनारसे, अगदी सोपी आहे रेसिपी

Published Oct 19, 2024 03:56 PM IST

Which rice to take to make Anarse: अनारसे विशेषतः सणासुदीच्या काळात बनवले जातात. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ चव असलेला, अनारसे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो.

How to make Anarse
How to make Anarse

How to make Anarse:  भारतीय पारंपारिक मिठाई असणाऱ्या अनारसच्या चवीमुळे तोंडाला एक अनोखा गोडवा येतो. भारतीय घरांमध्ये खास प्रसंगी चवदार अनारसे बनवले जातात. अनारसे विशेषतः सणासुदीच्या काळात बनवले जातात. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ चव असलेला, अनारसे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. आजकाल अनारसे बाजारात सहज उपलब्ध आहेत. परंतु यंदा दिवाळीला जर तुम्हाला घरच्या घरी स्वादिष्ट अनारसे बनवायचे असतील तर त्याची अतिशय सोपी रेसिपी तुम्हाला खूप मदत करू शकते. अनारसा बनवण्यासाठी तांदूळ २ दिवस अगोदर भिजवले जातात. हे दोन प्रकारे बनवता येते, एकतर गोल लाडूसारखे किंवा सपाट घारीसारखे. चला जाणून घेऊया स्वादिष्ट अनारसे बनवण्याची सोपी रेसिपी.

अनारसे बनवण्यासाठी साहित्य-

तांदूळ - २ कप

दही - १ टेबलस्पून

तीळ - २ ते ३ चमचे

पिठीसाखर - ३/४ कप

देशी तूप - तळण्यासाठी

अनारसे बनवण्याची रेसिपी-

चवदार अनारसे बनवण्यासाठी प्रथम तांदूळ दोन ते तीन दिवस पाण्यात (किमान ४८ तास) भिजत ठेवावे. अनारसेसाठी लहान आकाराचे आणि नवीन तांदूळ वापरणे चांगले. तांदूळ भिजवताना दर २४ तासांनी पाणी बदलावे. ठरलेल्या वेळेनंतर तांदूळातील पाणी काढून टाकावे आणि भिजवलेले तांदूळ जाड कापडावर पसरून सुकण्यासाठी सावलीतच ठेवावे.

जेव्हा तांदळातील बऱ्यापैकी पाणी सुकते, तेव्हा तांदूळ मिक्सरच्या साहाय्याने भरड प्रकारात बारीक करा आणि एका भांड्यात काढा. यानंतर, हे पीठ चाळणीतून चाळून घ्या आणि एका मोठ्या भांड्यामध्ये ठेवा. आता पिठात पिठीसाखर आणि थोडं तूप घालून नीट मिक्स करा. आता दही घालून त्याच्या मदतीने पीठ घट्ट मळून घ्या. यानंतर, पीठ १० ते १२ तास झाकून बाजूला ठेवा. ठरलेल्या वेळेनंतर पीठ घेऊन परत एकदा मळून सैलसर करून घ्या. यानंतर पिठाचे छोटे गोळे करून खसखशीत बुडवून घ्या. जेव्हा खसखस कणकेभोवती चांगले चिकटेल तेव्हा ते आपल्या तळहातामध्ये दाबा आणि सपाट करा. त्याचप्रमाणे सर्व गोळ्यांपासून अनारसे बनवा. यानंतर एका पातेल्यात देशी तूप टाकून मध्यम आचेवर गरम करा.

तूप गरम होऊन वितळल्यावर त्यात अनारसे टाका आणि अनारसे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या. यानंतर अनारसे एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवा. त्याचप्रमाणे सर्व त्याचप्रमाणे सर्व अनारसे तळून घ्या. आता अनारसे थंड होऊ द्या. चविष्ट अनारसे तयार आहेत. त्यांना हवाबंद डब्यात घालून ठेवा.

Whats_app_banner