Diwali Faral Recipe: फराळाची मजा वाढवेल 'लसूण शेव', ट्राय करा पारंपरिक रेसिपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Diwali Faral Recipe: फराळाची मजा वाढवेल 'लसूण शेव', ट्राय करा पारंपरिक रेसिपी

Diwali Faral Recipe: फराळाची मजा वाढवेल 'लसूण शेव', ट्राय करा पारंपरिक रेसिपी

Oct 24, 2024 11:07 AM IST

How To Make Lasun Sev: फराळामध्ये लज्जत वाढवण्यासाठी लसूण शेव प्रसिद्ध आहे. या शेवची चटपटीत आणि थोडीशी तिखट चव तोंडाला फारच छान लागते.

Diwali Faral Recipe
Diwali Faral Recipe (freepik)

Diwali Faral Recipe:  दिवाळी अवघ्या चार दिवसांवर आली आहे. महिलांची फराळाची तयारी जोरदार सुरु आहे. जवळपास दिवाळीचा फराळ बनवून तयार झाला आहे. अशात जर तुम्हाला आणखी काही चटपटीत करायचं असेल, तर आम्ही तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलो आहे. फराळामध्ये लज्जत वाढवण्यासाठी लसूण शेव प्रसिद्ध आहे. या शेवची चटपटीत आणि थोडीशी तिखट चव तोंडाला फारच छान लागते. अनेक लोकांना लसून शेव विशेष आवडते. दरवर्षी फराळामध्ये लसूणी शेवचा समावेश आवर्जून करतात. पण तुम्ही कधीही लसूण शेव बनवली नसेल आणि यंदा बनवण्याची इच्छा असेल, तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. चला तर मग पाहूया लसुण शेव बनवण्याची सोपी रेसिपी.

 

लसूण शेव बनवण्यासाठी साहित्य-

-८ लसूण

-१/२ टीस्पून ओवा

-१/२ टीस्पून काळी मिरी

-१/४ टीस्पून हळद

-१/२ टीस्पून काश्मिरी लाल मिरची पावडर

-३ चमचे तेल

- चिमूटभर हिंग

-३/४ टीस्पून मीठ

-२ कप बेसन

-पाणी

-तेल (तळण्यासाठी)

लसूण शेव बनवण्यासाठी रेसिपी-

-सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण पाकळ्या, ओवा, काळी मिरी, हळद आणि लाल तिखट घ्या.

-आता त्यात एक कप पाणी घाला आणि गुळगुळीत पेस्ट बनवून घ्या.

-तयार झालेली पेस्ट एका मोठ्या भांड्यात काढून घ्या.

-आता त्यामध्ये ३ चमचे तेल, चिमूटभर हिंग आणि मीठ घाला.

-सर्वकाही चांगले एकत्र करून चमच्याने फेटून घ्या.

-आता त्यात घेतलेले २ कप बेसन घाला आणि चमच्याने मिक्स करा.

- पुढे पाणी घालून पीठ मळायला सुरुवात करा.

-आवश्यकतेनुसार पाणी घालून गुळगुळीत आणि मऊ पीठ मळून घ्या.

-आता चकली बनवण्याच्या साच्याला आतून तेल लावून घ्या.

-यामध्ये थोडे पीठ घालून साच्या व्यवस्थित बंद करा.

-आता त्या साच्याच्या साहाय्याने गरम तेलात शेव पाडायला सुरुवात करा.

-एक मिनिटानंतर, शेव उलटा आणि दुसऱ्या बाजूला सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.

-अतिरिक्त तेल काढून टाकण्यासाठी पेपरवर ठेवा. शेवटी, लसूण शेवचे तुकडे करा. आणि हवाबंद डब्यात भरून ठेवा.

- चकलीच्या साच्यात वेगवेगळे पान असतात. त्यातील सर्वात बारीक शेवचे पान घेतल्यास शेव दिसेलही छान आणि चवही उत्तम लागेल.

Whats_app_banner