Diwali Faral: दिवाळीला बनवा पोह्यांची कुरकुरीत चकली, चवीला खमंग बनवायलाही सोपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Diwali Faral: दिवाळीला बनवा पोह्यांची कुरकुरीत चकली, चवीला खमंग बनवायलाही सोपी

Diwali Faral: दिवाळीला बनवा पोह्यांची कुरकुरीत चकली, चवीला खमंग बनवायलाही सोपी

Published Oct 18, 2024 11:22 AM IST

How to Make Chakli: चकली ही मुख्यत्वे महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र या राज्यातील आवडता पदार्थ आहे. परंतु तरी त्याच्या चवीमुळे चकली सर्वत्र पसंतीस येऊ लागली आहे.

Poha Chakli Recipe:
Poha Chakli Recipe: (shutterstock)

Poha Chakli Recipe:  दिवाळीचा सण आहे आणि खाण्यापिण्याची फारशी रेलचेल नाही हे शक्य नाही. त्यामुळेच दिवाळीला घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी अनेक प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. त्यालाच आपण फराळ असे म्हणतो. फराळामध्ये लोकांना चटपटीत चकली खूप आवडते. चकली ही मुख्यत्वे महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र या राज्यातील आवडता पदार्थ आहे. परंतु तरी त्याच्या चवीमुळे चकली सर्वत्र पसंतीस येऊ लागली आहे. बाजारातही चकली सहज उपलब्ध आहे. या दिवाळीत जर तुम्ही घरच्या घरी चकली बनवण्याचा विचार करत असाल तर आम्ही दिलेली रेसिपी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. तसे पाहायला गेले तर चकली विविध गोष्टींनी बनवली जाते. परंतु आज आपण इन्स्टंट पोह्यांपासून बनणारी चकली पाहणार आहोत. ही चकली बनवायला तर सोपी आहेच. शिवाय यासाठी साहित्य आणि वेळही कमी लागतो. चला तर मग पाहूया पोह्यांची चकली...

 

पोह्याची चकली बनवण्यासाठी लागणारे साहित्य-

२ कप पोहे

१ कप रवा

३ चमचे तूप

१ टीस्पून चिली फ्लेक्स

२ टीस्पून काळे तीळ

१ टीस्पून जिरे

चवीनुसार मीठ

गरजेनुसार तेल

पोह्यांची चकली बनवण्याची रेसिपी-

-सर्वप्रथम एका पातेल्यात २ वाट्या पाणी घेऊन गॅसवर गरम करायला ठेवा. आणि पाणी उकळल्यावर त्यात १ वाटी रवा टाका आणि चांगला फुलेपर्यंत शिजवा.

-नंतर त्यात ३ चमचे तूप घालून मिक्स करा आणि १० मिनिटे झाकून ठेवा.

-आता पोहे मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घ्या. आणि एका प्लेटमध्ये काढा.

-आता एका भांड्यात रवा आणि पोहे एकत्र करून त्यात मीठ घाला.

-नंतर त्यात तीळ, जिरे आणि चिली फ्लेक्स घालून हाताने चांगले मळून घ्या. थोडे थोडे पाणी घालून मऊ मळून घ्या.

-हाताला आणि भांड्याला पीठ चिकटू नये म्हणून हाताला तेल लावून पीठ मळून घ्या. अशाप्रकारे चकली बनवण्याचे पीठ तयार आहे.

-आता चकलीच्या साच्याला थोडे तेल लावा. थोडे पीठ चकलीच्या साच्यामध्ये भरा.

-एक जाड पॉलिथिन कागद पसरवून त्यावर थोडे तेल लावा. नंतर पॉलिथिन कागदवर गोलाकार चकल्या बनवून तयार करा. आणि नंतर चकलीची दोन्ही टोके दाबा म्हणजे ती उघडणार नाही.

-नंतर एका खोलगट कढईत तेल टाकून ते गरम करून गरम तेलात ४-५ चकल्या टाका.

-आणि चकली वरपर्यंत शिजली की चकली उलटा आणि बदामी होईपर्यंत तळून घ्या. नंतर एका प्लेटमध्ये काढून थंड होऊ द्या. अशाप्रकारे तुमची पोहे आणि रव्याची चकली तयार आहे.

Whats_app_banner