Diwali 2024: डायबिटीस असणाऱ्यांसाठी बनवा खास शुगर फ्री लाडू, सोपी आहे रेसिपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Diwali 2024: डायबिटीस असणाऱ्यांसाठी बनवा खास शुगर फ्री लाडू, सोपी आहे रेसिपी

Diwali 2024: डायबिटीस असणाऱ्यांसाठी बनवा खास शुगर फ्री लाडू, सोपी आहे रेसिपी

Published Oct 29, 2024 03:05 PM IST

Sugar Free Laddu for Diabetics: दिवाळीनिमित्त डायबिटीस असणाऱ्या लोकांसाठी आपण एक खास लाडूचा प्रकार बनवणार आहोत. ज्यामध्ये साखरेचा वापर न करता आपण तो तयार करणार आहोत. चला तर मग पाहूया ही अनोखी रेसिपी.

Sugar Free Laddu for Diabetics
Sugar Free Laddu for Diabetics (instagram)

Sugar Free Laddu:  दिवाळी हा सण खूप आनंद घेऊन येतो. या सणानिमित्त लोक एकमेकांच्या घरी जाऊन सणाच्या शुभेच्छा देतात. यामुळेच प्रत्येकाच्या घरी अनेक पदार्थ तयार होतात. सणासुदीला लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच सुट्ट्या असतात, त्यामुळे घरातील महिला नाश्ता, जेवण तसेच मिठाई, फराळ घरीच बनवतात.घरी फराळात तयार होणाऱ्या सर्व प्रकारच्या मिठाई पाहून त्या खाल्ल्याशिवाय राहवत नाही. ज्यांना मधुमेह आहे त्यांना ही मोठी समस्या उद्भवते. जर तुमच्या कुटुंबात मधुमेह आहे परंतु ती व्यक्ती मिठाईची शौकीन असेल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही.

येथे आज आम्ही तुम्हाला असा एक फराळाचा पदार्थ सांगणार आहोत. जे तुम्ही साखर न वापरतासुद्धा बनवू शकता. तरीसुद्धा तो पदार्थ चवीला गोड आणि स्वादिष्टच लागणार. दिवाळीनिमित्त डायबिटीस असणाऱ्या लोकांसाठी आपण एक खास लाडूचा प्रकार बनवणार आहोत. ज्यामध्ये साखरेचा वापर न करता आपण तो तयार करणार आहोत. चला तर मग पाहूया ही अनोखी रेसिपी.

गूळ आणि फुटण्याचे लाडू बनवण्यासाठी साहित्य-

-१ कप भाजलेले फुटाणे

-१/२ कप गूळ

-२ चमचे तूप

-१/२ टीस्पून वेलची पावडर

लाडू बनवण्याची रेसिपी-

लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम भाजलेले फुटाणे सोलून मिक्सरमध्ये टाकून त्याची भरड पावडर बनवा. त्याची पूर्ण पावडर करू नका, थोडे दाणेदार राहू द्या म्हणजे लाडूला चांगला पोत मिळेल. यानंतर कढईत २ टेबलस्पून तूप गरम करा. त्यात किसलेला गूळ घालून मंद आचेवर वितळू द्या. गूळ सतत ढवळत राहा म्हणजे तो करपणार नाही. आणि एकसारखे गुळगुळीत मिश्रण तयार होईल.

आता वितळलेल्या गुळामध्ये फुटण्याची भरड घाला आणि चांगले मिसळा. तसेच त्यात वेलची पूड टाका आणि मिश्रण चांगले एकजीव करा. काही मिनिटे शिजवा जेणेकरून ते घट्ट होईल आणि ओले वाटणार नाही. मिश्रण किंचित थंड होऊ द्या जेणेकरून तुम्हाला हाताला चटके बसणार नाहीत. आता थोडे थोडे मिश्रण हातात घेऊन गोल लाडू बनवा.

Whats_app_banner