How to make Bundi Ladoo: दिवाळीचा सण अगदी जवळ आला आहे. या खास प्रसंगी सर्वजण एकत्र येतात आणि एकमेकांसोबत आनंद शेअर करतात. दिवाळीच्या सणात फटाक्यांच्या आवाजासोबत स्वादिष्ट मिठाई खाण्यात एक वेगळाच आनंद असतो. हा खास प्रसंग साजरा करण्यासाठी अनेक प्रकारच्या मिठाई घरांमध्ये बनवल्या जातात. यालाच आपण फराळ असे म्हणतो.बूंदीचे लाडू हादेखील त्यापैकीच एक प्रसिद्ध प्रकार होय. तुम्ही अनेकदा बुंदीचे लाडू खात असाल, पण या दिवाळीत तुम्ही स्वतः बुंदीचे लाडू बनवले तर सगळेच तुमचे कौतुक करतील. आज आम्ही तुम्हाला बुंदीच्या लाडूंची अगदी सोपी आणि पारंपरिक रेसिपी सांगणार आहोत..
-५०० ग्रॅम बेसन
-१ लिटर पाणी किंवा दूध
-७५० ग्रॅम तूप
-३ १/२ कप पाणी
-केसरी रंग
-१०-१२ केसरचे तुकडे (पाण्यात भिजवलेले)
-५० ग्रॅम काजूचे तुकडे,
-५० ग्रॅम मनुका,
-१० वेलची,
-बुंदी काढण्यासाठी झारा
सर्वप्रथम बेसनमध्ये पाणी किंवा दूध मिसळून पातळ पेस्ट तयार करा. यानंतर एका कढईत तूप गरम करण्यासाठी ठेवा. तयार मिश्रण गाळून घ्या आणि गरम झालेल्या तुपात मंद आचेवर त्यांचा रंग हलका तपकिरी होईपर्यंत टाळून घ्या. यानंतर साखर आणि पाणी मिसळून पाक तयार करा. तयार पाकात केशर आणि केशरी रंग टाका.त्यामुळे लाडूला अगदी बाजारासारखा मस्त रंग येईल. आता तयार पाकामध्ये बुंदी, वेलची आणि ड्रायफ्रूट्स मिसळा. नंतर हाताच्या तळव्यावर हलके तूप लावून एक एक लाडू वळायला सुरुवात करा. अशाप्रकारे तुमचे बुंदीचे लाडू तयार आहेत.
संबंधित बातम्या