Diwali 2024: जिभेवर विरघळणारे गोड शंकरपाळे, 'या' सोप्या रेसिपीने बनतील अगदी खुसखुशीत
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Diwali 2024: जिभेवर विरघळणारे गोड शंकरपाळे, 'या' सोप्या रेसिपीने बनतील अगदी खुसखुशीत

Diwali 2024: जिभेवर विरघळणारे गोड शंकरपाळे, 'या' सोप्या रेसिपीने बनतील अगदी खुसखुशीत

Published Oct 17, 2024 10:00 AM IST

Diwali 2024 Recipes: घरातील स्त्रियांची फराळाची तयारी सुरु झाली आहे. अनेक स्त्रिया आपल्या पारंपरिक पद्धतीने फराळ बनवतात. तर काही मॉडर्न अंदाजाने बनवतात.

Shankarpale Recipe
Shankarpale Recipe

How to make Crispy Shankarpala:  सध्या एका पाठोपाठ एक सणांचा काळ सुरु आहे. गणेशोत्सव, नवरात्री, दसरा त्यांनंतर आता दिवाळीची लगबग सुरु झाली आहे. दिवाळी अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपली आहे. घरातील स्त्रियांची फराळाची तयारी सुरु झाली आहे. अनेक स्त्रिया आपल्या पारंपरिक पद्धतीने फराळ बनवतात. तर काही मॉडर्न अंदाजाने बनवतात. परंतु काही स्त्रियांना अद्याप फराळ करणे कठीण जाते. त्यामुळे त्या चांगल्या रेसिपीच्या शोधात असतात. आज आपण फराळातील एक उत्तम पदार्थ असणाऱ्या शंकरपाळ्याबाबत पाहणार आहोत. अनेकांची तक्रार असते की त्यांचे शंकरपाळ्या कधी कठीण तर कधी मऊ बनतात. मग आता चिंता नको. कारण आज आम्ही तुम्हाला अशी रेसिपी सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही अगदी खुसखुशीत शंकरपाळ्या बनवू शकाल. चला तर मग पाहूया ही सोपी रेसिपी...

 

शंकरपाळ्या बनवण्यासाठी साहित्य-

२ कप मैदा

१/३ कप पाणी

१/३कप तूप

१/२ कप पिठीसाखर

१ कप दूध

तळण्यासाठी तेल

शंकरपाळ्या बनवण्याची रेसिपी-

-एका भांड्यात पिठीसाखर, तूप आणि दूध घ्या. हे तिन्ही जिन्नस एकत्र करून मिक्स करून घ्या.

-आता तयार केलेले हे मिश्रण गॅसवर मंद आंचेवर ठेवावे. साखर वितळण्याची वाट पाहावी.

-यादरम्यान मिश्रणाला उकळी अजिबात येऊ देऊ नये. त्यासाठी सतत चमच्याने हलवत राहावे.

-आता या मिश्रणात आपण घेतलेला मैदा घालावा.

-मैदा घालून हे पीठ चांगले मळून घ्यावे. लक्षात ठेवा मिश्रण जास्त घट्ट किंवा जास्त सैल होता कामा नये.

-पिठाचे हे मिश्रण कमीत कमी एक तासभर भिजत ठेवावे.

-आता एक तासानंतर या मिश्रणातून छोटे गोळे घेऊन चपाती सारखे लाटून घ्यावे.

-आता या चपातीला आडवे-तिडवे काप देऊन सुंदर अशा शंकरपाळ्या बनवून घ्याव्या.

-आपल्या आवडीनुसार तुम्ही जाड आणि पातळ काप करू शकता.

-आता एका खोलगट कढईत तेल किंवा तूप गरम करून घ्यावे. परंतु तेल जास्त कडकडीत गरम होणार नाही याची काळजी घ्यावी.

-नाहीतर शंकरपाळ्या करपून जातील.

-या तेलात हळुवार चारी बाजुंनी भाजून घेऊन एका परातीत टिश्यू पेपरवर काढून घ्याव्या.

-अशाप्रकारे तुमच्या खुसखुशीत शंकरपाळ्या तयार आहेत.

Whats_app_banner