Diwali 2024 : दिवाळी पार्टीसाठी साडी नेसताय? बॉलिवूड अभिनेत्रींच्या ब्लाऊज डिझाईनने लागतील सौंदर्याला चार चांद!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Diwali 2024 : दिवाळी पार्टीसाठी साडी नेसताय? बॉलिवूड अभिनेत्रींच्या ब्लाऊज डिझाईनने लागतील सौंदर्याला चार चांद!

Diwali 2024 : दिवाळी पार्टीसाठी साडी नेसताय? बॉलिवूड अभिनेत्रींच्या ब्लाऊज डिझाईनने लागतील सौंदर्याला चार चांद!

Oct 30, 2024 04:53 PM IST

Blouse Designs For Diwali Party 2024 : साडीचा ब्लाऊज तुमच्या लूकला पारंपारिक किंवा स्टायलिश टच देतो. यंदा दिवाळी पार्टीसाठी, तुमच्या आवडत्या सेलिब्रिटींनी परिधान केलेल्या या स्टेटमेंट ब्लाऊज डिझाईनपासून प्रेरणा घेऊ शकता.

Diwali 2024 fashion tips: Statement blouses to wear for your Diwali party.
Diwali 2024 fashion tips: Statement blouses to wear for your Diwali party.

Diwali 2024 fashion Tips : दिवाळीचा सण आपल्या प्रियजनांसोबत उत्साह आणि आनंदाने जल्लोष करून साजरा करण्याचा सण आहे. या दरम्यान दिवाळीत अनेक ठिकाणी आपल्या आप्तस्वकीयांसह मिळून पार्टीचे आयोजन केले जाते. अशा या पार्ट्यांना उपस्थित राहण्यासाठी, तुम्हाला सर्वोत्तम पारंपारिक पोशाख निवडणे आवश्यक आहे. आपल्यापैकी बरेच जण दिवाळीच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या या गेट-टुगेदरसाठी साडी किंवा लेहेंगा निवडतात. अशावेळी आपल्याला लूकला वेगळा टच देण्यासाठी तुम्हाला स्टेटमेंट ब्लाऊज आवश्यक आहे. यासाठी तुम्ही तुमच्या आवडत्या सेलिब्रिटींकडून प्रेरणा घेऊ शकता.

सोनम कपूरचा हटके ब्लाऊज!

कर्नाटकातील लाल माती आणि मुलतानी मातीपासून बनवलेला सोनम कपूरचा हा खास थेट अंगावर परिधान करता येणारा हा ब्लाऊज दिवाळी हंगामाचे खास आकर्षण आहे. क्रियेटीव्हीटी आणि हटके असलेला असाच ब्लाऊज बनवण्यासाठी तुम्ही सोनम कपूरकडून प्रेरणा घेऊ शकता. हा स्ट्रॅपलेस आणि बॉडी-हगिंग ब्लाऊज तुमच्या शरीराचे माप वापरून कागदी साच्यापासून बनवले जाऊ शकतो आणि त्याला मागच्या बाजून नाडी लावून बांधले जाऊ शकते. 

मिरर स्टडेड ब्लाउज

Bhumi Pednekar and Ananya Panday wear the mirror-embellished blouse.
Bhumi Pednekar and Ananya Panday wear the mirror-embellished blouse.

साधी सिल्कची साडी असो किंवा झगमगीत लेहेंगा स्कर्ट, मिरर स्टडेड ब्लाऊज तुमच्या लूकला वेगळी चमक देऊ शकतो. यासाठी भूमी सारखा हाफ-स्लीव्ह मिरर स्टडेड ब्लाऊज निवडू शकता किंवा अनन्या सारख्या स्ट्रॅपलेस बस्टियरसह स्वीटहार्ट नेकलाईन असलेला ब्लाऊज निवडू शकता. भूमी आणि अनन्याने त्यांच्या लूकसोबत चोकर नेकलेस परिधान केला आहे.

क्लासिक सिल्क ब्लाउज हा एक पारंपारिक ब्लाऊज डिझाईनचा प्रकार आहे. हा ब्लाऊज साड्या आणि लेहेंगा स्कर्टसह उत्तम प्रकारे मॅच केला जाऊ शकतो.  शोभिताप्रमाणे, तुम्ही गोटा पट्टी भरतकाम आणि बॅकलेस डिझाइनसह त्यात आणखी काही बदल करू शकता.

बो-इन-द-बॅक ब्लाऊज

सब्यसाचीने डिझाईन केलेल्या आलिया भट्टच्या मेट गाला ब्लाऊजमध्ये पाठीमागे बो आणि पुढील बाजूस सिक्विन बस्टीअर आहे. हे डिझाइन तुमच्या पारंपारिक साडी किंवा लेहेंग्याला एक स्टायलिश टच देईल. तुम्ही शरारा किंवा प्लाझो पँटसोबतही असा ब्लाऊज घालू शकता.

ज्वेलरी ब्लाउज

Isha Ambani and Janhvi Kapoor wear the temple jewellery blouse.
Isha Ambani and Janhvi Kapoor wear the temple jewellery blouse.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्यात टेम्पल ज्वेलरी ब्लाऊज सर्वत्र लोकप्रिय झाले होते. ईशा अंबानी आणि जान्हवी कपूर यांनी या कार्यक्रमादरम्यान ही स्टाईल परिधान केली होती. तुम्ही देखील ही स्टेटमेंट स्टाईल प्लेन सिल्क ड्रेप किंवा सॅटिन लेहेंगा स्कर्टसोबत पेअर अप करू शकता.

Whats_app_banner