Akbar Travels ची दिवाळी ऑफर, फ्लाईट तिकीटवर बंपर सूट, प्लॅन करा ट्रीप
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Akbar Travels ची दिवाळी ऑफर, फ्लाईट तिकीटवर बंपर सूट, प्लॅन करा ट्रीप

Akbar Travels ची दिवाळी ऑफर, फ्लाईट तिकीटवर बंपर सूट, प्लॅन करा ट्रीप

Oct 23, 2024 01:42 PM IST

Akbar Travels Diwali Offers: अनेक विमान कंपन्यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत सरासरी विमान भाडे 20-25 टक्क्यांनी कमी केले आहे.

Diwali Flight Offers
Diwali Flight Offers (pexel)

Diwali Flight Offers:  एअरलाइन कंपनी अकबर ट्रॅव्हल्सने दिवाळीसाठी विमान भाड्यात बंपर सवलत देऊ केली आहे. यापूर्वी इतर विमान कंपन्यांनीही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भाडे कमी केले आहे. पीटीआईनुसार, अनेक विमान कंपन्यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत सरासरी विमान भाडे 20-25 टक्क्यांनी कमी केले आहे. कंपन्यांनी वाढवलेली क्षमता आणि अलीकडेच तेलाच्या किमतीत झालेली घसरण यामुळे किमती खाली आल्या आहेत.

अकबर ट्रॅव्हल्स सणासुदीच्या काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरात १० टक्के सवलत देत आहे. कंपनीच्या वेबसाइटनुसार,मालदीव, सिंगापूर, दुबई, बालीला जाण्यासाठी आणि तेथून एकेरी विमान तिकीट १२०२८ पासून सुरू होईल. मात्र, हे तिकीट बुकिंग आतापासून ते २८ फेब्रुवारी दरम्यान लागू असेल. या ऑफर अंतर्गत, प्रवासी फेब्रुवारी पर्यन्त प्रवासासाठी तिकीट बुक करू शकतात. महत्वाचं म्हणजे तुम्हाला ही ऑफर मिळवण्यासाठी हा ‘’DEALWALI'' हा प्रोमोकोड आवश्यक आहे

ऑफरबाबत नियम अणि अटी-

-ऑफर फक्त थेट www.akbartravels.com आणि अकबर ट्रॅव्हल्स ॲपवर वैध आहे.

-ही ऑफर Akbartravels.com च्या इतर कोणत्याही ऑफरशी जोडली जाऊ शकत नाही.

-भाडे नियमांनुसार तारीख बदल, रीबुकिंग आणि रिफंड चार्जेस लागू होतील.

-Akbartravels.com ने कोणत्याही वेळी ऑफर बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे.

-अकबरट्रॅव्हल्स डॉट कॉम सक्तीच्या घटनेमुळे उद्भवलेल्या कोणत्याही हानीसाठी जबाबदार राहणार नाही.

-कोणत्याही परिस्थितीत, या ऑफर अंतर्गत अकबर ट्रॅव्हल्सचे संपूर्ण दायित्व या ऑफर अंतर्गत प्रमोशनल सवलतीच्या रकमेपेक्षा जास्त असणार नाही.

 

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

 

Whats_app_banner