मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Breakup or Divorce: घटस्फोट किंवा ब्रेकअप असू शकतो स्ट्रेसफुल, या ५ टिप्सने स्वतःला करा मदत!

Breakup or Divorce: घटस्फोट किंवा ब्रेकअप असू शकतो स्ट्रेसफुल, या ५ टिप्सने स्वतःला करा मदत!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 24, 2024 03:04 PM IST

Shoaib Malik and Sania Mirza divorce: शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांचं विभक्त होणं सगळ्यांत जास्त चर्चेत आलं. जेव्हा एखादे नाते बिघडते तेव्हा आपण निराशा, तणाव आणि दुःख अनुभवतो. जर तुम्ही ब्रेकअपशी झगडत असाल, तर तुम्ही त्याला सामोरे जाण्यासाठी काही उपाय करणे गरजेचे आहे.

Tips to Deal with breakup and stressful
Tips to Deal with breakup and stressful (ottplay.com)

How to deal with breakup and divorce: ब्रेकअप किंवा घटस्फोट या गोष्टी पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये आल्या आहेत. याला कारण म्हणजे शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांचं विभक्त होणं. त्यांच्या विभक्त होण्यावरून घटस्फोट किंवा ब्रेकअप नंतर मेंटली किती त्रास होतो यावरही प्रकाश पडला. अशा घटना हा जीवनातील सर्वात तणावपूर्ण आणि भावनिकरीत्या लो अशी वेळ असू शकते. ब्रेकअपचे कारण काहीही असो, नातेसंबंध गमावल्याने तुमचे संपूर्ण जग उलटपालट होते. एक लक्षात घेण्यासारखं आलं की जेव्हा नातेसंबंध बऱ्याच काळापासून चांगले नसेल तर नातं तुटणे हे वेदनादायक असू शकते. जर तुमचे नातेही तुटले असेल किंवा घटस्फोट झाला असेल, तर मानसिक तणावावर मात करण्यासाठी तुम्ही काही उपाय केले पाहिजेत. याबद्दल जाणून घेऊयात.

स्वतःला ब्रेक द्या

जर्नल ऑफ पर्सनल रिलेशनशिपच्या मते, विभक्त झाल्यावर स्वत:ला थोडा वेळ द्या. आवर्जून विश्रांती घ्या. हे लक्षात घ्या तुम्ही सुपरमॅन किंवा सुपरगर्ल नाही आहात. स्वतःला या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी बाकीच्या गोष्टीतून ब्रेक घ्या.

Relationship Tips: मिठीमध्ये असते वेगळीच ताकद, जाणून घ्या या ४ प्रकारच्या मिठीचा अर्थ!

एकटेपणा जाणवू देऊ नकात

आपण एकटे आहोत आता आपल्यासोबत कोणी नाही असं समजू नकात. आपल्या मित्रमैत्रिणीसोबत आणि आणि कुटुंबासह आपल्या भावना गोष्टी शेअर करा असे केल्याने तुम्हाला ब्रेकअप किंवा घटस्फोटाचा सामना करण्यास मदत होऊ शकते. स्वतःला कधीही एकटे ठेवू नका. इतरांशी सतत संवाद साधा.

Relationship Tips: नात्यात नेहमीच असुरक्षितता जाणवते? या गोष्टीत लक्षात घ्या!

इतरांची मदत घ्या

ब्रेकअप किंवा घटस्फोटानंतर पुन्हा मेंटली नॉर्मल होण्यासाठी इतरांकडून मदत घ्या. ही वेळ स्वतःहून हाताळण्याचा प्रयत्न करू नका.

Relationship Tips: स्वतःसोबतच रिलेशनशिप सुधारण्यासाठी या गोष्टी करू नकात!

काऊन्सलरची मदत घ्या

गरज भासल्यास काऊन्सलरची मदत घ्या. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की काऊन्सलर ही अशी व्यक्ती आहे जी तुम्हाला अजिबात जज न करता तुमचं बोलणं ऐकून घेईल. तुम्ही त्यांच्याशी मोकळेपणाने बोलू शकाल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel