Fried Rice: डिनरमध्ये बनवा चिली गार्लिक फ्राईड राइस, चायनीज आवडणाऱ्यांसाठी परफेक्ट आहे रेसिपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Fried Rice: डिनरमध्ये बनवा चिली गार्लिक फ्राईड राइस, चायनीज आवडणाऱ्यांसाठी परफेक्ट आहे रेसिपी

Fried Rice: डिनरमध्ये बनवा चिली गार्लिक फ्राईड राइस, चायनीज आवडणाऱ्यांसाठी परफेक्ट आहे रेसिपी

Jun 15, 2024 12:15 PM IST

Dinner Recipe: रात्रीच्या जेवणात काही हलके आणि टेस्टी खायचे असेल तर चिली गार्लिक फ्राईड राइस बनवा. ही रेसिपी झटपट तयार होते.

चिली गार्लिक फ्राईड राइसची रेसिपी
चिली गार्लिक फ्राईड राइसची रेसिपी (unsplash)

Chilli Garlic Fried Rice Recipe: अनेक वेळा रात्रीच्या जेवणात काहीतरी हलकं खाण्याची इच्छा असते. यातही नेहमी खिचडी सारखे प्रकार खायचा कंटाळा केला जातो. तुम्हाला सुद्धा काहीतरी हलके पण टेस्टी खायचे असेल तर तुम्ही चिली गार्लिक फ्राईड राइसची ही रेसिपी ट्राय करु शकता. तुम्हाला चायनिज खायला आवडत असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. विशेष म्हणजे ही रेसिपी झटपट तयार होते आणि बनवायला खूप सोपी आहे. लहान मुलांना सुद्धा ही रेसिपी खूप आवडेल. चला तर मग वाट कसली पाहताय जाणून घेऊया चिली गार्लिक फ्राईड राइस कसे बनवायचे.

चिली गार्लिक फ्राईड राईस बनवण्यासाठी साहित्य

- २०० ग्रॅम (शिजवलेले) तांदूळ

- १ टीस्पून हिरवे लसूण

- १ टीस्पून चिली सॉस

- अर्धा टीस्पून काळी मिरी

- अडीच कप कोबी

- अडीच कप बीन्स

- अडीच कप गाजर

- १ चिमूट अजिनोमोटो

- २ टीस्पून तेल

- चवीनुसार मीठ

चिली गार्लिक फ्राईड राईस बनवण्याची रेसिपी

हे बनवण्यासाठी सर्वप्रथम एका पॅनमध्ये तेल आणि सर्व भाज्या घालून भाजून घ्या. भाजी शिजून मऊ झाल्यावर त्यात शिजलेला भात घाला. यानंतर काळी मिरी, मीठ, अजिनोमोटो, सोया सॉस घालून भात चांगले मिक्स करा. आता साधारण १० ते १५ मिनिटे भात शिजवून घ्या. तुमचा चविष्ट चिली गार्लिक फ्राईड राईस तयार आहे. गरमा गरम सर्व्ह करा.

Whats_app_banner