मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Ganeshotsav 2023: उत्सवाच्या १० दिवस बाप्पाला अर्पण करा रोज वेगवेगळे मोदक!

Ganeshotsav 2023: उत्सवाच्या १० दिवस बाप्पाला अर्पण करा रोज वेगवेगळे मोदक!

Sep 18, 2023 05:36 PM IST

Modak For Ganesh Chaturthi: गणपती उत्सव अवघ्या एका दिवसावर आला आहे. बाप्पाला १० दिवस रोज वेगवेगळा नैवेद्य काय दाखवायचा, हा प्रश्न पडला असेल तर वेगवेगळ्या मोदकांची ही यादी पाहा.

मोदकचे विविध प्रकार
मोदकचे विविध प्रकार (Freepik)

Different Types of Modak: यंदा १९ सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे. हा दिवस देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. ढोल-ताशांच्या गजरात घरोघरी बाप्पाचे स्वागत केले जाते. त्यानंतर १० दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवात बाप्पाला विविध प्रकारचा प्रसादही दिला जातो. काही जण तर बाप्पाला रोज मोदक अर्पण करतात. मात्र एक किंवा दोन प्रकारचे मोदक बनवले जातात. पण तुम्हाला माहित आहे का की गणेशोत्सवाच्या १० दिवसांसाठी तुम्ही वेगवेगळे मोदक बनवू शकता. येथे आम्ही विविध प्रकारचे मोदक सांगत आहोत.

ट्रेंडिंग न्यूज

१. ड्राय फ्रूट मोदक

ड्राय फ्रुट्स मोदक भरपूर सुक्या मेव्यांसह तयार केला जातो. मात्र त्याचा बेस नारळ आणि खवा मिसळून बनवला जातो. त्यात सुका मेवा भरपूर असल्याने ते आरोग्यासाठीही चांगले असते. लक्षात ठेवा की साखर वापरण्याऐवजी त्यात खजूर घाला.

२. चणा डाळ मोदक

चणा डाळ मोदक तांदळाच्या पिठ, गव्हाचे पीठ किंवा मैद्यापासून बनवते जाते. यात शिजवलेली चणा डाळ आणि गूळ घालून ते बनवतात. तुम्ही ते घरी सहज तयार करू शकता.

३. मलाई मोदक

मलाई मोदक दूध, पनीर किंवा छेना आणि वेलचीसह इतर घटक मिसळून बनवले जातात. हे बहुतेक मलाई लाडूच्या रूपात बनवले जातात. तर तुम्ही त्याला मोदकाचा आकार देऊ शकता.

४. चॉकलेट मोदक

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चॉकलेट आवडते. अशा परिस्थितीत तुम्ही बाप्पाला अर्पण करण्यासाठी चॉकलेट मोदक बनवू शकता.

५. पनीरचे मोदक

दही आणि पनीरपासून बनवलेले मोदकही छान लागतात. तुम्हाला फक्त पनीर, बारीक केलेली साखर आणि काजू, बदाम, पिस्ता यांसह सुका मेवा हवा आहे. त्याचा बेस मैद्याचा असतो.

६. केसरी मोदक

केसरी मोदक ही देखील एक प्रसिद्ध रेसिपी आहे, जे तुम्ही घरी पटकन तयार करू शकता. दुधात केशर घालून घट्ट होईपर्यंत शिजवा. मग साचा वापरून मोदक तयार करा.

७. पान मोदक

ज्यांना पानाची चव आवडते त्यांना हा मोदक खूप आवडेल. त्यासाठी गुलकंद लागणार आहे. चव देण्यासाठी विड्याची पानेही लागतील.

८. बेसनाचे मोदक

बेसन प्रत्येक घरात असते. अशा परिस्थितीत बेसनापासून मोदक बनवणे सोपे आहे. यासाठी बेसन तुपात भाजून लाडू ऐवजी मोदकाच्या आकारात तयार करा.

९. तळलेले मोदक

दरवर्षी गणेशोत्सवात तळलेले मोदक तुम्ही अनेक वेळा केले असतील. ते चवीला अप्रतिम आहेत. त्यात गूळ आणि खोबरा किसाचे सारण भरले जाते.

१०. आंब्याचे मोदक

खवा आणि आंब्याच्या गरापासून बनवलेले मोदक छान लागतात. ते बनवण्यासाठी वेलची आणि तुपाचाही वापर केला जातो. हे मोदक तुम्ही बाप्पाला अर्पण करू शकता.

WhatsApp channel