स्कोलियोसिस ही एक अशी समस्या आहे ज्यामध्ये पाठीचा कणा एका बाजूला वळतो. स्कोलियोसिसमध्ये, तुमचा मणका डावीकडे आणि उजवीकडे C किंवा S आकारात वळतो. ही स्थिती सर्व वयोगटातील लोकांना प्रभावित करते. बालपण किंवा पौगंडावस्थेत जेव्हा तुमची हाडं वाढतात तेव्हा ती विकसित होण्याची शक्यता जास्त असते. स्कोलियोसिस नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र न्यूरोलॉजिकल स्थिती, अनुवांशिकता किंवा काही आरोग्य समस्या यास कारणीभूत ठरतात. सुरुवातीला अनेकांना वेदना किंवा कोणतीही मोठी लक्षणे देखील जाणवत नाहीत, ज्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मुंबई येथील स्पाइन अँड स्कोलियोसिस सर्जन प्रा. डॉ. धीरज सोनवणे यांनी याबाबत काही गैरसमजूती आणि त्याचे वास्तव सांगितले आहे.
गंभीर प्रकरणांमध्ये, स्कोलियोसिस एखाद्याच्या हालचालीवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो, पाठदुखी होऊ शकते आणि कधीकधी श्वासोच्छवासावर देखील परिणाम होऊ शकतो. स्कोलियोसिस असलेले बरेच लोक अजूनही निरोगी आणि पूर्णपणे सक्रिय जीवन जगू शकतात परंतु दुर्दैवाने, या स्थितीबद्दल अनेक गैरसमज आहेत. या समजुती अनावश्यक भीती किंवा गोंधळ निर्माण करू शकतात. या स्थितीची जाणीव तुम्हाला काल्पनिक गोष्टींपासून तथ्यांमध्ये फरक करण्यास मदत करू शकते.
स्कोलियोसिस बद्दल सामान्य समजुती
गैरसमज : केवळ चुकीची शारीरीक स्थिती स्कोलियोसिसला कारणीभूत ठरतो
वास्तविकता : स्कोलियोसिस केवळ चुकीची शारीरीक स्थिती किंवा मागच्या बाजूस झुकल्याने होतो. या स्थितीला विविध घटक कारणीभूत ठरतात. यामध्ये हार्मोनल बदल, मणक्याच्या प्लेटमध्ये झालेली वाढ, जन्मजात किंवा अनुवंशिकता, वाढते वय, न्यूरोमस्क्युलर स्थितीचा समावेश असतो. तुमच्या मणक्याचे आरोग्य चांगले राखण्यासाठी चांगली शारीरीक स्थिती महत्त्वाची आहे हे खरे असले तरी, ती स्कोलियोसिसला रोखत नाही किंवा ते थेट स्कोलियोसिसला कारणीभूत ठरत नाही.
गैरसमज : जड बॅकपॅक वापरल्याने स्कोलियोसिस होतो
वास्तविकता : जड बॅकपॅक उचलल्याने कमकुवत स्नायूंवर खूप ताण पडतो आणि त्यामुळे तीव्र वेदना होऊ शकतात परंतु त्यामुळे स्कोलियोसिस होत नाही. स्कोलियोसिस मध्ये पाठीचा कणा बहुतेकदा संरचनात्मक बदलांमुळे झुकतो, बाह्य वजनामुळे नाही. कमी वजनाने योग्यरित्या बसवलेले बॅकपॅक वापरल्याने पाठीचा ताण कमी होण्यास मदत होऊ शकते.
गैरसमज : स्कोलियोसिसमध्ये शस्त्रक्रिया हा एकमेव उपचार आहे
वास्तविकता : स्कोलियोसिसच्या रुग्णांसाठी शस्त्रक्रिया हा एकमेव उपचार पर्याय असू शकत नाही. जेव्हा पाठीचा कणा झीजतो किंवा गंभीर आरोग्य समस्या निर्माण होतात तेव्हा शस्त्रक्रिया आवश्यक असते. बहुतेक वेळा नियमित देखरेख, शारीरिक उपचार किंवा स्थितीच्या तीव्रतेनुसार ब्रेसिंगच्या मदतीने ते सहजपणे व्यवस्थापित केले जाऊ शकते.
गैरसमज : जर तुम्हाला स्कोलियोसिस असेल तर तुम्हाला व्हीलचेअरवर रहावे लागेल
वास्तविकता : स्कोलियोसिसमध्ये व्हीलचेअरवर रहावे लागणे हे अत्यंत दुर्मिळ आहे. विशेषतः जन्मजात किंवा अनुवांशिक प्रकारात गंभीर स्कोलियोसिस असलेले लोक जास्त धोका पत्करतात. स्कोलियोसिसचे रुग्ण त्यांच्या डॉक्टरांनी शिफारस केलेल्या उपचारांसह निरोगी, सामान्य आणि सक्रिय जीवन जगू शकतात. केवळ गंभीर प्रकरणांमध्ये, एखाद्याला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो, पाठदुखी होऊ शकते, न्यूरोलॉजिकल समस्या, कॉस्मेटिक समस्या उद्भवू शकतात. या स्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी वेळीच उपचार करणे गरजेचे आहे.
गैरसमज : स्कोलियोसिसमध्ये ब्रेसिंग काम करत नाही
वास्तविकता : इडिओपॅथिक किंवा जन्मजात स्कोलियोसिसमध्ये वाढत्या टप्प्यात मुलांमध्ये ब्रेसिंग उपयुक्त आहे. हे वाढीच्या या टप्प्यात स्कोलियोसिसची वाढ कमी करते किंवा त्याची प्रगती थांबवते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या