पंजाबी गायक दिलजीत दोसांज हा कायमच चर्चेत असतो. त्याची गाणी सातासमुद्रापार प्रसिद्ध आहेत. दिलजीतचा चाहता वर्ग मोठा असून परदेशातही त्याचे लाखो चाहते आहेत. तो नेहमीच त्याच्या गाण्यांमुळे चर्चेत असतो. पण यावेळी तो त्याच्या संगीतामुळे नाही तर हातात घातलेल्या डायमंडच्या घड्याळामुळे चर्चेत आहे. दिलजीतच्या या घड्याळाची किंमत किती? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
नुकताच दिलजीत अमेरिकेच्या लोकप्रिय टीव्ही शो द टुनाइट शो विथ जिमी फॅलनमध्ये सहभागी झाला. या शोमध्ये भाग घेणारा तो पहिला पंजाबी गायक आहे. तसेच या शोमध्ये दिलजीतने गायलेली गाणी प्रेक्षकांच्या मनावर जादू करणारी होती. सध्या सोशल मीडियावर या कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. एका व्हिडीओमध्ये दिलजीतचे घड्याळ दिसत आहे. ते घड्याळ पाहून सर्वजण चकीत झाले आहेत.
वाचा: 'कथेमध्ये आम्ही थोडा बदल करायचो', शाहरुख खान लेक अबरामला सांगायचा महाभारतातील कथा
दिलजीत दोसांझने अमेरिकन शोमध्ये सहभागी होण्यासाठी पूर्णपणे पंजाबी लूक केला होता. पांढऱ्या रंगाचा हाफ स्लीव्ह कुर्ता आणि त्यावर भरतकाम. तसेच पंजाबी लुंगी, पांढरी पगडी असा पंजाबी लूक त्याने केला होता. मात्र, दिलजीतच्या या लूकपेक्षा हातात घातलेल्या हिऱ्याच्या घड्याळाने सर्वांचे लक्ष वेधले.
वाचा: कसला बॉम्ब पडलाय यार; आई-बाबा होणाऱ्या निपूण-वैदेहीची गोष्ट! 'एक दोन तीन चार'चा टीझर प्रदर्शित
दिलजीतने परफॉर्मन्ससाठी खास ऑडेमार्स पिगुएट घड्याळ परिधान केले होते. जे दिलजीतसाठी कस्टम डिझाइन करण्यात आले आहे. घड्याळाची खासियत म्हणजे ४१ मिमी मॉडेलच्या या घड्याळाभोवती हिरे आहेत. स्टेनलेस स्टील आणि रोज गोल्डपासून हे घड्याळ बनवण्यात आले आहे. या घड्याळाची किंमत १.२ कोटी रुपये आहे.
दिलजीत दोसांज हा बॉलिवूडमधीस प्रसिद्ध गायक आणि अभिनेता देखील आहे. तो काही दिवसांपूर्वी क्रू या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात तब्बू, करिना कपूर आणि क्रिती सोनॉन महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. दिलजीतने या चित्रपटात कस्टम अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. आता हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहाता येत आहे.
संबंधित बातम्या