How to manage blood sugar level: मधुमेहाचा आजार हा ग्लोबल आजर झाला आहे. हा आजाराने तरुणांनाही ग्रासले आहे. मधुमेहाचे वेळेत व्यवस्थापन केले नाही तर इतर अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात. याच कारणांमुळे मधुमेहामध्ये साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. निरोगी साखरेची पातळी राखण्यासाठी शांत झोप महत्त्वाची आहे. साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी काही टिप्स पाळणे फायदेशीर ठरते. त्याचबद्दल पोषणतज्ञ लवनीत बत्रा यांनी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर खास पोस्ट केली आहे. ज्यामध्ये तिने मधुमेहाच्या रुग्णांना रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी झोपण्यापूर्वी कोणता रूटीन फॉलो करायाचं याबद्दल सांगितलं आहे.
कॅमोमाइल चहा एक आरोग्यदायी चहा आहे. हा चहा विशेषत: मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. याच कारणांमुळे रात्री झोपण्यापूर्वी १ कप कॅमोमाइल चहा प्यावा.
मेथीचे दाणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी सगळ्यात बेस्ट पदार्थ आहे. हे रक्तातील साखरेची पातळी वाढू देत नाही. यामध्ये असलेले हायपोग्लायसेमिक गुणधर्म शरीरातील रक्तातील साखरेची पातळी कमी करायला मदत करतात. १ चमचा मेथी दाणे पाण्यात भिजवून त्याचे सेवन करा.
रात्री झोपण्यापूर्वी १५ मिनिटे वज्रासनमध्ये बसा. हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर ठरते. यामुळे रक्तदाबही नियंत्रणात राहतो. शरीरातील रक्ताभिसरणही सुधारते.
रात्री झोपण्यापूर्वी कधीही कॅफिन असलेले पेय पिऊ नका. अन्यथा साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते. चहा, कॉफी, सोडा पिऊ नका, कारण त्यामुळे लवकर झोप येण्यास मदत होत नाही. चांगली झोप न मिळाल्याने रक्तातील साखरेवर परिणाम होतो.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)