Health Benefits of Guava Leaves: पेरू हे स्वादिष्ट फळ मानले जाते आणि आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असते. पेरूची चव तुम्हाला वर्षभर चाखता येत नसली तरी त्याच्या पानांचे सेवन करून तुम्ही वर्षभर आरोग्यासाठी फायदे मिळवू शकता. पेरूप्रमाणेच रिकाम्या पोटी त्याची पाने चावून खाण्याचेही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. पेरूच्या पानांमध्ये फायबर, व्हिटॅमिन ए आणि सी, फॉलिक अॅसिड आणि आहारातील खनिजे, पोटॅशियम, तांबे आणि मॅगनीज भरपूर प्रमाणात असतात. सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी पेरूची पाने चावून खाल्ल्याने अनेक आजारांपासून मुक्ती मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊया पेरूची पाने खाल्ल्याने आरोग्याला कोणते फायदे मिळतात.
पेरूच्या पानांचे दररोज सेवन केल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो. यामध्ये असलेले फिनोलिक रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. ज्याचा फायदा मधुमेहाच्या रुग्णाला होतो. याशिवाय पेरूच्या पानांच्या अर्कमध्ये असलेले अँटी-हायपरग्लाइसेमिक गुणधर्मही रक्तातील साखर नियंत्रित करू शकतात.
सकाळी रिकाम्या पोटी पेरूची पाने चावून खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते. पेरूच्या पानांमध्ये डायटरी फायबर चांगल्या प्रमाणात असते. अशावेळी ही पाने चावून खाल्ल्याने अपचन, बद्धकोष्ठता, गॅस, अॅसिडिटी सारख्या पोटाच्या समस्या होण्याची शक्यता कमी होते आणि पचनसंस्था निरोगी राहते.
सकाळी रिकाम्या पोटी पेरूची पाने चावून खाल्ल्याने पोटातील चरबी सोबतच वजन कमी होण्यास ही मदत होते. यामध्ये असणारी संयुगे शरीरातील कार्बोहायड्रेट्सचे शोषण रोखतात, ज्यामुळे वजन वाढत नाही.
पेरूमध्ये आढळणारे व्हिटॅमिन-सी रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास आणि रोगास कारणीभूत रोगजनकांशी लढण्यास मदत करते. पेरूच्या पानांचे सेवन करून रोगप्रतिकार शक्ती वाढवता येते.
पेरूच्या पानांचे नियमित सेवन केल्याने बीपी म्हणजेच रक्तदाब नियंत्रणात राहतो. पेरूप्रमाणेच याच्या पानांमध्येही पोटॅशियम आणि फायबरचे प्रमाण चांगले असते, जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)