Diabetes Care: मधुमेही रुग्णांनी केवळ बटाटा नाही तर या भाज्या सुद्धा टाळाव्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Diabetes Care: मधुमेही रुग्णांनी केवळ बटाटा नाही तर या भाज्या सुद्धा टाळाव्या

Diabetes Care: मधुमेही रुग्णांनी केवळ बटाटा नाही तर या भाज्या सुद्धा टाळाव्या

Apr 16, 2023 08:30 PM IST

How to control blood sugar: मधुमेहाच्या रुग्णांनी रोजच्या आहारात या भाज्यांचा समावेश करू नये. या भाज्या मधुमेहामध्ये शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढवतात.

मधुमेहामध्ये या भाज्या टाळाव्या
मधुमेहामध्ये या भाज्या टाळाव्या

Avoid these Vegetables in Diabetes: आजकाल मधुमेह हा एक सामान्य आजार झाला आहे. जे बहुतेक लोकांमध्ये चुकीचे खाण्याच्या सवयी आणि जीवनशैलीमुळे होत आहे. जेव्हा शरीरातील इन्सुलिनचे उत्पादन कमी होते किंवा अजिबात होत नाही तेव्हा मधुमेहाची समस्या सुरू होते. हे इन्सुलिन पचलेल्या अन्नाचे ऊर्जेत रूपांतर करते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. पण जेव्हा मधुमेह होतो तेव्हा ते रक्तातील साखरेची पातळी बिघडवते. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ लागतात. अशा परिस्थितीत, आहारात भरपूर गोष्टी टाळण्याचा सल्ला दिला जातो. मधुमेहाच्या रुग्णांनी भाज्या खाण्याच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी आणि त्या खाणे पूर्णपणे टाळावे.

हिरवा कांदा

हिरवा कांदा म्हणजेच स्प्रिंग ओनियन मधुमेहाच्या रुग्णांनी अजिबात खाऊ नये. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त आहे आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण फायबरपेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळे हिरवा कांदा खाल्ल्याने शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.

गाजर आणि बीटरूट

गाजर आणि बीटरूटसारख्या भाज्यांमध्ये नैसर्गिक साखर असते. अशा परिस्थितीत ज्यूस बनवून तो पिणे किंवा थेट खाणे मधुमेहाच्या रुग्णांना त्रासदायक ठरू शकते.

रताळे

कधी कधी मधुमेहामध्ये रताळे खाण्याचा सल्ला दिला जातो. पण कमी ग्लायसेमिक इंडेक्स असूनही कार्बोहायड्रेटचे प्रमाण रक्तातील साखर वाढवते. जर तुम्ही थोडेसे सुद्धा जास्त प्रमाणात रताळे खाल्ले तर ते शरीराला हानी पोहोचवू शकते.

बटाटा

मधुमेहाच्या रुग्णांना बटाटे खाण्यास पूर्णपणे मनाई आहे. यामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण मधुमेहाच्या रुग्णांसाठी धोकादायक ठरते.

 

मका

आजकाल लोक भाज्यांमध्ये स्वीट कॉर्नचा भरपूर वापर करतात. पण जर तुम्हाला मधुमेह असेल तर स्वीट कॉर्न किंवा मका अजिबात खाऊ नका. त्यात फायबरचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. तर कर्बोदके खूप जास्त असतात. त्यामुळे ते खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते. यासोबतच मक्यामध्ये कार्बोहायड्रेटही भरपूर असते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner