Diabetes Mistakes That Spike Sugar Level: मधुमेह हा टाइप १ आणि टाइप २ अशा दोन प्रकारचा असतो. टाइप २ डायबिटीज हा जीवनशैलीचा विकार आहे. जे थोडी काळजी घेऊन मॅनेज केले तर संपूर्ण आयुष्य सहज चांगल्या पद्धतीने जगता येते. मधुमेहाचे अनेक रुग्ण आपल्या आहारात या चुकांची पुनरावृत्ती करतात. जे त्यांच्या साखरेची पातळी नियंत्रित न होण्याचे सर्वात मोठे कारण बनते. आयुर्वेदिक डॉक्टर यांनी सोशल मीडियावर या तीन चुका शेअर केल्या आहेत. साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायची असेल तर मधुमेहाच्या रुग्णांनी खाण्याच्या या चुका टाळल्या पाहिजे. जाणून घ्या अशा कोणत्या चुका आहेत ज्यामुळे साखरेची पातळी वाढते.
मधुमेह असलेले अनेक रुग्ण गोडव्यासाठी साखरेऐवजी गूळ किंवा खडी साखरेचा वापर करू लागतात. जे पूर्णपणे चुकीचे आहे. कारण गूळ किंवा खडी साखर खाल्ल्यानंतर सुद्धा शरीरात ग्लुकोज तयार होते आणि रक्तातील साखर वाढते. गूळ आणि खडी साखर आरोग्यदायी आणि नैसर्गिक असले तरी मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्यापासून लांब राहावे.
अनेक जण जेवण केल्यानंतर फळं हे डेझर्ट साखरे खातात. जेणेकरून गोडवा तुम्हाला तृप्त करेल. तुम्हाला ही सवय असेल तर ही सवय लगेच सोडा. कारण जेवल्यानंतर किंवा काही खाल्ल्यानंतर फळ खाल्ल्याने ब्लॉटिंग, गॅस आणि अपचन होऊ शकते. जेवणानंतर फळे खाल्ल्यास न पचलेले अन्न लहान आतड्यात पोहोचते आणि मग अपचनासारख्या समस्या सुरू होतात.
आयुर्वेदात दह्याची प्रकृती पूर्णपणे वेगळी सांगितली आहे. दही पचायला कठीण, गरम आणि चिकट असते. ज्यामुळे शरीरातील कफ दोष वाढतात. या कफमुळे वजन वाढते आणि चयापचय कमकुवत होते. कफमुळे पोषण शोषून घेण्यास त्रास होतो. अशा वेळी दह्याऐवजी अधूनमधून ताक पिणे चांगले.
मधुमेहाचे रुग्ण आहाराच्या बाबतीत अनेकदा या तीन चुकांची पुनरावृत्ती करतात. ज्यामुळे साखरेची पातळी वाढते किंवा इन्सुलिन रेझिस्टन्समध्ये समस्या उद्भवतात.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या