Diabetes Friendly Breakfast: मधुमेही रुग्णांसाठी बेस्ट आहे हा नाश्ता, नियंत्रणात राहील रक्तातील साखर
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Diabetes Friendly Breakfast: मधुमेही रुग्णांसाठी बेस्ट आहे हा नाश्ता, नियंत्रणात राहील रक्तातील साखर

Diabetes Friendly Breakfast: मधुमेही रुग्णांसाठी बेस्ट आहे हा नाश्ता, नियंत्रणात राहील रक्तातील साखर

Published Apr 21, 2024 10:43 AM IST

Breakfast for Diabetes: योग्य खाण्याच्या सवयी आणि निरोगी जीवनशैली हे टाइप २ मधुमेहाच्या समस्येमध्ये खूप मदत करतात. मधुमेहाच्या रुग्णाला रोज नाश्त्यात काय द्यावे हा प्रश्न पडला असेल तर हे पर्याय पाहा.

Diabetes Friendly Breakfast: मधुमेही रुग्णांसाठी बेस्ट आहे हा नाश्ता, नियंत्रणात राहील रक्तातील साखर
Diabetes Friendly Breakfast: मधुमेही रुग्णांसाठी बेस्ट आहे हा नाश्ता, नियंत्रणात राहील रक्तातील साखर (unsplash)

Diabetes Friendly Breakfast Options: मधुमेही रुग्णांनी खाण्यापिण्याच्या सवयींबाबत अत्यंत काळजी घ्यावी लागते. थोड्याशा निष्काळजीपणाने रक्तातील साखरेची पातळी वाढते. अशा परिस्थितीत मधुमेहावर नियंत्रण ठेवणे कठीण होऊन बसते. टाइप २ डायबिटीजच्या व्यवस्थापनात जीवनशैली आणि निरोगी आहाराची विशेष भूमिका असते. जर तुम्ही डायबिटीज फ्रेंडली ब्रेकफास्ट पर्याय शोधत असाल तर हे पदार्थ नक्कीच लक्षात ठेवा. हे नाश्त्यात मधुमेही रुग्णांना ऊर्जा तर देईलच पण रक्तातील साखरेची पातळीही राखेल. मधुमेही रुग्णांनी नाश्त्यात हे पदार्थ खाल्ले पाहिजे.

उपमा

पारंपारिक भारतीय नाश्त्यामध्ये उपमाचा नक्कीच समावेश होतो. कमी ग्लायसेमिक इंडेक्समुळे रव्यापासून बनवलेल्या उपमामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही. गाजर, मटार, बीन्स यांसारख्या भाज्या घातल्यास ते मधुमेहाच्या रुग्णांना नाश्त्यात सहज देता येते.

दलिया

गव्हापासून बनवलेल्या दलियामध्ये फायबर आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असतात. जे सहज पचते आणि रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढण्यापासून रोखते. भाज्या आणि नट्स घालून दलिया आणखी निरोगी बनवता येतो.

बेसन चिला

बेसनचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. या कारणामुळे मधुमेहाच्या रुग्णांना बेसनपासून बनवलेले धिरडे किंवा चिला खायला दिले जाऊ शकते. बेसन चीला हा नाश्त्यासाठी चांगला पर्याय आहे. त्यात पालक आणि कांदा असतो. टोमॅटो घालून त्याचे पोषण वाढवता येते.

मूग डाळ चिला

मूग डाळ बारीक करून बनवलेला चिला हा अतिशय आरोग्यदायी नाश्ता आहे. प्रथिने, फायबर आणि आवश्यक पौष्टिकतेने समृद्ध असल्याने हाय ब्लड शुगर असलेल्या रुग्णांना ते दिले जाऊ शकते.

व्हेजिटेबल उत्तपम

डाळ आणि तांदूळ आंबवून आणि भाज्या घालून तयार केलेला उत्तपम हा उत्तम नाश्ता आहे. कमी ग्लायसेमिक इंडेक्स असण्यासोबतच त्यात प्रथिने देखील असतात. फायबर आणि कार्बोहायड्रेट्सचे चांगले संतुलन आहे. हे मधुमेही रुग्ण नाश्त्यात सहज खाऊ शकतात.

स्प्राउट्स

मोड आलेली मुगाची डाळ आणि काळे हरभरे यापासून बनवलेले स्प्राउट्स डायबिटीजच्या रुग्णांना नाश्त्यात देता येतात. फायबर आणि प्रथिनेसमृद्ध असण्याव्यतिरिक्त त्यात अँटीऑक्सिडेंट देखील असतात. हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते आणि इंसुलिन सेंसेटिव्हिटी सुधारते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner