Diabetes Control Tips In Marathi : आजकाल खराब जीवनशैलीमुळे अनेकांना मधुमेहाचा त्रास होत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, याचा इलाज तुमच्या स्वयंपाकघरातच दडलेला आहे. प्रत्येक भारतीय स्वयंपाक घरातील मसाल्याच्या डब्यातील तमालपत्र मधुमेहावर खूप प्रभावी ठरू शकते. जेवणाची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी तमालपत्राचा वापर अन्नात केला जातो. तसेच, हे तमालपत्र मधुमेहामध्ये वाढलेली रक्तातील साखर कमी करण्याचे काम करते. या पानांमध्ये आढळणारे पोषक घटक आणि जीवनसत्त्वे मधुमेह कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात.
तमालपत्र अर्थात तेजपत्ता तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात मुबलक प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आणि अनेक जीवनसत्त्वे व खनिजे असतात. याशिवाय त्यात लोह, पोटॅशियम, सेलेनियम, कॅल्शियम आणि तांबे हे घटक देखील असतात. जर, तुम्ही दररोजच्या आहारात तमालपत्राचे सेवन केले, तर ते तुमच्या रक्तातील साखर कमी करण्यास मदत करू शकते. तमालपत्राचा रोज वापर केल्याने अनेक जुनाट आजारही नियंत्रणात राहतात. वाचा याचे फायदे...
मधुमेहाबाबत दररोज अनेक प्रकारचे संशोधन केले जाते. या संशोधनात त्यांच्या आहारात आणि इतर कामांमध्ये बदल करून नैसर्गिकरित्या मधुमेहावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जीवनशैलीत काही बदल करून रक्तातील साखर नियंत्रित ठेवता येते, असे अनेक संशोधनांमध्ये दिसून आले आहे. यासाठी तुम्ही योग्य आहार घेऊ शकता आणि व्यायाम करू शकता, ज्यामुळे इन्सुलिनचे कार्य सुधारू शकते. त्याचप्रमाणे जर्नल ऑफ बायोकेमिकल न्यूट्रिशनच्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, टाईप २ मधुमेहामध्ये तमालपत्र रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी प्रभावी ठरू शकते.
जेवणाच्या पदार्थांची चव वाढवण्यासाठी तमालपत्राचा वापर केला जातो. याशिवाय रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही तमालपत्राचा चहा पिऊ शकता. सकाळी रिकाम्या पोटी तमालपत्राचे पाणी प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. यासाठी १ ग्लास पाण्यात १ तमालपत्र टाका आणि रात्रभर भिजत ठेवा. यानंतर सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी थोडेसे कोमट करून प्या. त्यामुळे मधुमेहावर नियंत्रण ठेवणे सोपे होऊ शकते. यासोबतच मधुमेही रुग्णांनी आपली औषधे देखील सुरू ठेवली पाहिजेत. तमालपत्र आपल्या शरीरातील अनेक आजारांवर औषधी म्हणून काम करते.
(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )