Diabetes Care : मधुमेहामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढली? ‘या’ सोप्या टिप्समुळे मिळेल क्षणार्धात आराम!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Diabetes Care : मधुमेहामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढली? ‘या’ सोप्या टिप्समुळे मिळेल क्षणार्धात आराम!

Diabetes Care : मधुमेहामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढली? ‘या’ सोप्या टिप्समुळे मिळेल क्षणार्धात आराम!

Nov 11, 2024 02:30 PM IST

Diabetes CareTips : जर तुम्हाला तुमचे आयुष्य सुरक्षित ठेवायचे असेल, तर रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे.

Diabetes Care Tips
Diabetes Care Tips (pixabay)

Diabetes Care Tips : मधुमेह ही एक अशी समस्या आहे, जी आज लाखो लोकांच्या जीवनावर परिणाम करत आहे. अनियमित दैनंदिन दिनचर्या, असंतुलित आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे लोकांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. हा एक असा आजार आहे, ज्याचा किडनी आणि हृदयाच्या आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होतो. या आजारात जर तुम्हाला तुमचे आयुष्य सुरक्षित ठेवायचे असेल, तर रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे. त्यामुळे आज या लेखात आम्ही तुम्हाला रक्तातील साखर नियंत्रित करण्याचे सोपे आणि घरगुती उपाय सांगणार आहोत. नियमित व्यायाम आणि संतुलित आहाराचा अवलंब करून तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकता, तर चला जाणून घेऊया सविस्तर...

दररोज व्यायाम करा

जर तुम्ही नियमित व्यायाम केला तर तुमच्या रक्तातील साखर नक्कीच नियंत्रणात राहते. व्यायामामुळे स्नायूंमध्ये ग्लुकोजचा वापर वाढतो. यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते.

फायबर युक्त पदार्थांचे सेवन करा

फायबर रक्तातील साखरेची पातळी राखण्यासाठी उपयुक्त आहे. आपल्या आहारात याचा समावेश करण्यासाठी हिरव्या भाज्या, फळे आणि सुक्या मेव्याचे सेवन करा. यामुळे चयापचय वाढतो आणि साखरेची पातळी कमी होऊ लागते.

भरपूर पाणी प्या

पाण्याच्या कमतरतेमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. हे टाळण्यासाठी दिवसातून किमान तीन ते चार लिटर पाणी प्या. हे मूत्रपिंडांना अतिरिक्त साखर काढून टाकण्यास मदत करते.

Diabetes Care : काही मिनिटांतच मधुमेह येईल नियंत्रणात! तज्ज्ञांनी सांगितले ‘हे’ ५ सोपे घरगुती उपाय नक्की करा

पुरेशी झोप घ्या

चांगली झोप आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे. वास्तविक झोपेच्या कमतरतेमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढतच जाते. त्यामुळे दररोज सात ते आठ तासांची झोप आवश्यक आहे.

ताण घेऊ नका

तणावाचा थेट परिणाम आपल्या रक्तातील साखरेवर होतो. जर तुम्हाला तणावातून आराम मिळवायचा असेल तर दररोज ध्यान आणि योगासने करा. यामुळे तुम्ही तणावमुक्त व्हाल आणि आतून फ्रेशही वाटू लागेल.

वजन नियंत्रणात ठेवा

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी तुमचे वजन नियंत्रणात ठेवणे हा महत्त्वाचा भाग आहे. सकस आहार आणि नियमित व्यायामाने वजन नियंत्रणात ठेवा. यामुळे तुम्हाला मधुमेहाचा त्रास होणार नाही.

मेथीचे पाणी प्या 

मेथीचे पाणी प्यायल्यानेही साखर नियंत्रित राहते. यासाठी तुम्हाला एक चमचा मेथीचे दाणे १ ग्लास पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्या पोटी ते पाणी प्यायचे आहे.

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

Whats_app_banner