Diabetes Care : काही मिनिटांतच मधुमेह येईल नियंत्रणात! तज्ज्ञांनी सांगितले ‘हे’ ५ सोपे घरगुती उपाय नक्की करा
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Diabetes Care : काही मिनिटांतच मधुमेह येईल नियंत्रणात! तज्ज्ञांनी सांगितले ‘हे’ ५ सोपे घरगुती उपाय नक्की करा

Diabetes Care : काही मिनिटांतच मधुमेह येईल नियंत्रणात! तज्ज्ञांनी सांगितले ‘हे’ ५ सोपे घरगुती उपाय नक्की करा

Nov 05, 2024 03:05 PM IST

Diabetes Care Tips : मधुमेहाच्या रुग्णांनी स्वतःची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या लोकांनी वेळोवेळी टेस्ट करून घ्याव्यात आणि काही घरगुती उपायांचा अवलंब करावा, जेणेकरून साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येईल.

Diabetes
Diabetes

Diabetes Care Tips In Marathi : मधुमेह हा आजार दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे, जो जगभरातील लाखो लोकांना प्रभावित करत आहे. त्याचबरोबर भारतातही बहुतांश लोकांना मधुमेहाची लागण होताना दिसत आहे. भारतातही १०० दशलक्ष लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. एका अहवालानुसार, जगातील १०% तरुणांना वयाच्या २०व्या वर्षापासून मधुमेहाची लागण होत आहे. यापैकी निम्म्या लोकांना त्यांच्या या आजाराची माहितीही नसते. यावरूनच मधुमेह हा आजार किती गंभीर आहे, याचा अंदाज येतो. मधुमेह रोखणे अत्यंत गरजेचे आहे. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण कोणत्या घरगुती पद्धतींचा अवलंब करू शकतो, हे जाणून घेऊया... 

मधुमेहाचे प्रकार

मधुमेहाचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत, टाइप-१ मधुमेह आणि टाइप-२ मधुमेह. यापैकी टाईप-२ हा अधिक प्राणघातक आहे. मधुमेहामध्ये शरीरातील इन्सुलिनची पातळी असंतुलित होते. टाइप-१मध्ये कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे इन्सुलिन तयार होत नाही. तर, टाईप-२ मध्ये इन्सुलिन तयार होते, पण ग्लुकोजचे प्रमाण जास्त असल्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढते. याशिवाय, काही महिलांना गर्भधारणेदरम्यान शरीरात इन्सुलिनच्या निर्मितीमध्ये समस्या निर्माण होते, ज्याला गर्भधारणे दरम्यानचा मधुमेह म्हणतात. मधुमेह हा जीवनशैलीचा आजार आहे, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी दैनंदिन जीवनात काही बदल करणे आवश्यक आहे. या बदलांमुळे मधुमेह बऱ्यायाच प्रमाणात आटोक्यात ठेवता येतो.

Diabetes Control : मधुमेहाच्या रुग्णांनी आवर्जून खावीत ‘ही’ हिरवी पानं; अजिबात वाढणार नाही तुमची शुगर!

मधुमेह नियंत्रणासाठी घरगुती टिप्स

सकस आहार- सकस आहार घेतल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणे सोपे आहे. टाइप-२च्या रुग्णांनी त्यांच्या आहारात अशा गोष्टींचा समावेश करावा, ज्यामुळे त्यांना फायदा होईल. कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ आणि कमी कॅलरी असणारा आहार घ्यावा.

शारीरिक हालचाली- जर तुमचे शरीर फक्त एकाच जागी बसून कोणतीही शारीरिक क्रिया करत नसेल, तर केवळ मधुमेहच नाही तर लठ्ठपणा आणि कोलेस्ट्रॉलसारख्या गंभीर समस्या देखील तुम्हाला घेरू शकतात. टाइप १ आणि २ मधुमेह असलेल्यांनी त्यांच्या दैनंदिन जीवनात थोडा व्यायाम केला पाहिजे. शरीराची हालचाल होऊन रक्ताभिसरण सुधारते.

तपासणी करा - जीवनशैली बदलून तुम्ही साखरेवर बऱ्याच अंशी नियंत्रण ठेवू शकत असाल तरी, वेळोवेळी साखरेची पातळी तपासूनही संभाव्य धोका टाळता येऊ शकते. जर तुम्ही टाइप-१ रुग्ण असाल, तर तुम्ही दररोज साखरेच्या पातळीचे निरीक्षण केल्यास, तुम्ही स्वतःचे संरक्षण करू शकता.

वजन नियंत्रण - तुमच्या वाढलेल्या वजनाकडे लक्ष द्या. लठ्ठपणा हे देखील साखरेचे कारण आहे. यासाठी उत्तम पर्याय म्हणजे दररोज व्यायाम करणे.

मेथीचे पाणी - मेथीचे पाणी प्यायल्यानेही साखर नियंत्रित राहते. यासाठी तुम्हाला एक चमचा मेथीचे दाणे १ ग्लास पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्या पोटी ते पाणी प्या.

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner